Bhuimug Crop Management : जानेवारी महिन्यात विदर्भात उन्हाळी हंगामात भुईमूग पिकाची (Bhuimug Crop) लागवड करण्यात आली आहे. सध्या या पिकावर जमिनीत उद्भवणाऱ्या खोडकुज/मुळकुज या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.
या रोगाचे नियंत्रण भुईमूग पीक (Bhuimug Crop) ६०-७० दिवसांचे असेपर्यंत करणे आवश्यक असल्याचे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी बुरशीनाशकाची प्रक्रिया करून पेरणी केलेली आहे त्यांच्या पिकामध्ये प्रादुर्भाव कमी आहे. (Bhuimug Crop)
रोगग्रस्त झाडाची प्रमुख लक्षणे
पीक रोपावस्थेत असताना जमिनीलगत काळ्या रंगाची बुरशीची वाढ आढळून येते आणि रोप कोलमडून पडते. जमिनीलगत खोडावर पांढऱ्या रंगाची बुरशी आढळून येते, पाने पिवळसर होऊन कालांतराने झाड मलूल होऊन वाळते.
अशी करा उपाययोजना
* रोगट झाडांचे प्रमाण २५-३० टक्क्यांपर्यंत आढळून आल्यास कार्बेन्डाझीम किंवा व्हिटाव्हॅक्स २५ ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून पिकामध्ये ज्या भागात प्रादुर्भाव दिसून येतो त्या ठिकाणी व सभोवताली जमिनीमध्ये ओतावे/ड्रेनचिंग करावे
* किंवा रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असल्यास जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा २.५ किलो प्रती २५ किलो शेणखतात मिसळून प्रती हेक्टरी जमिनीत पुरेसा ओलावा असताना रोपांच्या खोडाशी/मुळाशी द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Bhuimug Crop)
सध्या या पिकावर जमिनीत उद्भवणाऱ्या खोडकुज/मुळकुज या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या रोगाच्या दीर्घकालीन प्रभावी नियंत्रणासाठी जमिनीत पिकांची फेरपालट करताना मका, ज्वारी व बाजरी यासारख्या तृणधान्य पिकांचा अंतर्भाव करायला हवा. - संतोष गहूकर, तेलबिया संशोधन केंद्र, पीडीकेव्ही.
हे ही वाचा सविस्तर: Krushi salla : वाढत्या उन्हात पिकांची अशी घ्या काळजी वाचा सविस्तर