Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > 'मधमाशी पालन' देईल साथ; ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी घ्या पुढाकार

'मधमाशी पालन' देईल साथ; ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी घ्या पुढाकार

'Beekeeping' will provide support; Take initiative to boost rural economy | 'मधमाशी पालन' देईल साथ; ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी घ्या पुढाकार

'मधमाशी पालन' देईल साथ; ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी घ्या पुढाकार

Madhmashi Palan : मधमाशांचा इतिहास मानवाच्या इतिहासापेक्षा खूप जुना आहे. मानवाच्या उदयापूर्वीही मधमाशा आणि तत्सम कीटक पृथ्वीवर होते. हे कीटक फुलांवर अवलंबून राहतात आणि फुलांच्या परागसिंचनामुळे अनेक वनस्पती, झाडे आणि फळझाडांचे अस्तित्व टिकते.

Madhmashi Palan : मधमाशांचा इतिहास मानवाच्या इतिहासापेक्षा खूप जुना आहे. मानवाच्या उदयापूर्वीही मधमाशा आणि तत्सम कीटक पृथ्वीवर होते. हे कीटक फुलांवर अवलंबून राहतात आणि फुलांच्या परागसिंचनामुळे अनेक वनस्पती, झाडे आणि फळझाडांचे अस्तित्व टिकते.

मधमाशांचा इतिहास मानवाच्या इतिहासापेक्षा खूप जुना आहे. मानवाच्या उदयापूर्वीही मधमाशा आणि तत्सम कीटक पृथ्वीवर होते. हे कीटक फुलांवर अवलंबून राहतात आणि फुलांच्या परागसिंचनामुळे अनेक वनस्पती, झाडे आणि फळझाडांचे अस्तित्व टिकते.

जर हे उपयुक्त कीटक नष्ट झाले, तर अनेक वनस्पती नष्ट होतील आणि पर्यायाने मानवासहित अनेक प्राणी संकटात येतील. त्यामुळे मधमाशांचा पृथ्वीवरील वावर जीवनसायकलसाठी अत्यंत महत्व आहे.

दरम्यान याच मधमाशांचे यशस्वी संगोपन करून आजचा तरुण शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा एक उत्तम उद्योग उभारू शकतो. जाणून घेऊया याविषयीची सविस्तर माहिती.  

मधमाशी पालनाचे उद्देश

• कृषी व उद्यानिकी पिकांचे (भाजीपाला, फळवर्गीय, तेलवर्गीय) परागसिंचन करून उत्पादन वाढवणे.

• मध, मेण आणि तत्सम पदार्थांचे उत्पादन करणे.

• रॉयल जेली आणि परागकण तयार करून मानवी आरोग्यासाठी उपयोग करणे.

• संधीवाताची चिकित्सा करण्यासाठी मधमाशांपासून विष तयार करणे.

सर्वसाधारणपणे मध उत्पादन हा मुख्य उद्देश असला तरी, पिकांचे उत्पादन वाढीसाठी मधमाशी पालन कृषी क्षेत्रासाठी अनिवार्य आहे.

मधमाशांचे प्रकार

• सातपुडी (सातेळ) मधमाशी (Apis cerana indica) : संपूर्ण भारतात आढळते., झाडांच्या पोकळ्या, दगडांच्या कपारी, घरांच्या रिकाम्या जागेत राहतात. एकाच ठिकाणी सात ते आठ पोळ्या बांधतात. स्वभावाने शांत, कृत्रिम लाकडी पेट्यांत सहज पाळता येतात.

सातपुडी (सातेळ) मधमाशी (Apis cerana indica)
सातपुडी (सातेळ) मधमाशी (Apis cerana indica)

• युरोपीयन मधमाशी (Apis mellifera) : युरोपमधून भारतात आयात केली. आकाराने सातपुडी मधमाशांपेक्षा मोठी. एक पेटीतून ३०–४० किलो मध मिळतो. लॅगस्ट्रॉथ मधुपेट्या वापरून पालन केले जाते.

युरोपीयन मधमाशी (Apis mellifera).
युरोपीयन मधमाशी (Apis mellifera).

• झुडपी / लहान मधमाशी (Apis florea) : २०×१५ सेमी पोळे तयार करतात. मध मिळवण्याचे प्रमाण खूप कमी (0.5 किलो प्रति पोळा). लाकडी पेटीत राहू शकत नाहीत, त्यामुळे पालन कठीण.

झुडपी/लहान मधमाशी (Apis florea) .
झुडपी/लहान मधमाशी (Apis florea) .

• डॅमर/डांस माशी (Melipona / Trigona) : आकाराने सर्वात लहान. पोळे द्राक्षासारखी, 6–12 इंच लांबीची बांधतात. डंखाने छोट्या कुचका करतात; अत्यंत सुरक्षात्मक. मधाचा रंग थोडा आंबट, खारट किंवा गोड असतो. व्यावसायिक पालन कठीण.

डॅमर/डांस माशी (Melipona/Trigona).
डॅमर/डांस माशी (Melipona/Trigona).

• आय्या मधमाशी (Apis dorsata) : आकाराने सर्वात मोठी, स्थलांतर करणारी. भयंकर रागीट व दंश करणारी. मोठमोठ्या झाडावर किंवा उंच इमारतीवर पोळे बांधतात. मधाचा उत्पादन क्षमता: २५–३० किलो प्रति पोळा, पण पालन व्यावसायिक दृष्ट्या कठीण.

आय्या मधमाशी (Apis dorsata).
आय्या मधमाशी (Apis dorsata).

भारतात सातपुडी व युरोपीयन मधमाशी पालनासाठी सर्वोत्तम मानल्या जातात.

मधमाशांचे जीवनचक्र 

माशी

अंड्याची अवस्था

अळी अवस्था

कोष अवस्था

पूर्ण वाढ

आयुष्य

कार्य

कामकरी

1–3 दिवस

4–9 दिवस

10–20 दिवस

21 वा दिवस

1–3 महिने

सर्व कष्टाची कामे

नर

1–3 दिवस

4–9 दिवस

10–23 दिवस

24 वा दिवस

4 महिने

राणीशी संयोग

राणी

1–3 दिवस

4–9 दिवस

10–15 दिवस

16 वा दिवस

2–3 वर्ष

अंडी घालणे

 

मधमाशी पालनासाठी साहित्य/उपकरणे

मधमाशांची लाकडी पेटी, जाळीचा बुरखा, हातमोजे, धुरी यंत्र, राणी पिंजरा व राणी पकडण्याची पेटी, मध काढण्याचे यंत्र, खाद्य/पाक पात्र, सुरी/चाकू, मधमाशा पकडण्याची जाळी.

टीप : मधमाशा हाताळताना डंखाची भीती न ठेवता, निर्भयपणे काम करावे.

मध गोळा करण्यासाठी उपयुक्त वनस्पती

  • झाडे : कडुलिंब, शेवगा, हादगा, जांभुळ, आंबा, लिंबू, बोर, संत्रा, मोसंबी, पेरू, चिंच, शिसम, अडुळसा, निरगुडी, कवट, आवळा, रिठा, गुलमोहर, बेल, वेडीबाभुळ, सुबाभुळ, निलगीरी, वॉटर ब्रश, साल, करंज इ.

  • भाजीपाला : भोपळा, काकडी, कोथिंबीर, दोडके, कोहळे, तुर, मुग, कारळ, सुर्यफुल, तिळ, जवस, मोहरी, वाटाणा, चणा, कापूस, भेंडी, ओवा, जिरे, बडीसोप, मिरे, गोबी, फुलगोबी, गाजर, मुळा, कांदा, वांगे, टमाटे, गुलाब, ॲस्टर, झेंडू.

दक्षता

मधमाशा पालनासाठी मधपेटी ठेवणे फायदेशीर. राणीमाशी दीर्घकाळ अंडी घालते म्हणून ती सुरक्षित ठेवावी. मेणकिडा हा सर्वात मोठा शत्रू, नियमित स्वच्छता आवश्यक. फुलांमधील मध कमी झाल्यास ४–५ दिवसांनी साखरेचा पाक द्यावा.

मधमाशी पालनाविषयी अधिक माहीतीसाठी

• संचालक, केंद्रिय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, ११५३ ए गणेशखिंड रोड, पुणे.

• महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सुतारी लोहारी कार्यशाळा, एम. आय. डी. सी., डब्लु ३, गोकुळ शिरगांव, जि. कोल्हापुर फोन. ०२३१२६७२२७६.

• मधमाशी पालन प्रशिक्षण संस्था, महाबळेश्वर, सातारा ४१२८०६ फोन - ०२१६८-२६०२६४.

• जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ. (जिल्हा मुख्यालय).

• कृषी किटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी- ४३१४०२ फोन-०२४५२-२२८२३५.

प्रा. संजय बडे
सहाय्यक प्राध्यापक, कृषि विद्या विभाग,
दादासाहेब पाटील कृषि महाविद्यालय,
दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर.

हेही वाचा : हिरवळीचे खते देतील साथ; शेतकरी राजांनो, यंदा शेती खर्चात करा मोठी कपात

Web Title : मधुमक्खी पालन: ग्रामीण अर्थव्यवस्था को बढ़ावा, पहल करें!

Web Summary : मधुमक्खी पालन पौधों के जीवन का समर्थन करता है। किसान मधुमक्खी पालन के माध्यम से ग्रामीण अर्थव्यवस्था को बढ़ावा दे सकते हैं। यह फसल उत्पादन बढ़ाता है और शहद और शाही जेली जैसे उत्पाद बनाता है। मुख्य प्रजातियों में एपिस सेराना इंडिका और एपिस मेलिफेरा शामिल हैं। सफलता के लिए उचित देखभाल और ज्ञान आवश्यक है।

Web Title : Beekeeping: A boost for rural economy, take the initiative!

Web Summary : Beekeeping supports plant life. Farmers can boost rural economies through beekeeping. It increases crop production and creates products like honey and royal jelly. Key species include Apis cerana indica and Apis mellifera. Proper care and knowledge are essential for success.