Lokmat Agro >स्मार्ट शेती > आडसाली ऊस लागवड करताय? कसे कराल नियोजन? वाचा सविस्तर

आडसाली ऊस लागवड करताय? कसे कराल नियोजन? वाचा सविस्तर

Are you planting sugarcane in Adsali? How will you plan? Read in detail | आडसाली ऊस लागवड करताय? कसे कराल नियोजन? वाचा सविस्तर

आडसाली ऊस लागवड करताय? कसे कराल नियोजन? वाचा सविस्तर

adsali us lagwad राज्यात पावसाची परिस्थिती बघून शेतकऱ्यांचे आडसाली ऊस लागवडीचे नियोजन सुरु आहे.

adsali us lagwad राज्यात पावसाची परिस्थिती बघून शेतकऱ्यांचे आडसाली ऊस लागवडीचे नियोजन सुरु आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात ऊस लागवड सुरु: १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी, पुर्वहंगामी: १५ ऑक्टोंबर ते १५ नोंव्हेबर, आडसाली: १५ जुलै ते १५ ऑगस्ट ह्या तीन हंगामात केली जाते. सध्या आडसाली ऊस लागवडीची लगबग सुरु आहे.

आडसाली ऊस लागवडीसाठी महत्वाच्या गोष्टी

  1. आडसाली उसाच्या लागवडीची कामे ३० ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावीत.
  2. ऊस लागवडीसाठी दोन सरीमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी. ठेवावे. पट्टा पध्दतीसाठी मध्यम जमिनीत ९०-१५० सें.मी. व भारी जमिनीत ९०-१८० सें.मी. पट्टा पध्दतीचा अवलंब करावा.
  3. रोगग्रस्त किडग्रस्त शेतातील व खोडव्याचे बेणे लागणीस वापरू नये. ऊस बेणे मळ्यातीलच चांगले ऊस बेणे निवडून लागणीसाठी वापरावे.
  4. आडसाली लागण करताना को ८६०३२, फुले ०२६५, फुले ऊस १५०१२ आणि व्हीएसआय ०८००५ यापैकी कोणत्याही शिफारशीत वाणांचा जमिनीच्या मगदुरानुसार वापर करावा.
  5. ऊस बेणे लागण करण्यापूर्वी १० ग्रॅम कार्बेन्डॅझिम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये १० मिनिटे बुडवावे आणि तेच बेणे परत १ किलो अॅसेटोबॅक्टर आणि १२५ ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात ३० मिनिटे बुडवून ठेवावे व नंतर लागणीसाठी वापरावे, त्यामुळे नत्राच्या मात्रेत ५०% व स्फुरदाच्या मात्रेत २५% इतकी बचत होते.
  6. वाळवी किडीच्या नियंत्रणासाठी क्लोथीआनिडीन ५०% डब्ल्यू.डी. जी. हेक्टरी २.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी पंपाची तोटी (नोझल) काढून सरीतून सोडावे व मुळ पोखरणारी अळीच्या बंदोबस्तासाठी फिप्रोनिल ०.३% दाणेदार प्रति हेक्टरी २५ किलो सरीमध्ये चळीतून द्यावे.
  7. ऊस लागणीकरीता उसाच्या एक डोळा अथवा दोन डोळा टिपरीचा वापर करावा.
  8. हुमणी किडीचा बंदोबस्त करण्यासाठी, हुमणीग्रस्त ऊस पिकांची रोपे उपटावीत. जमिनीत मुळाशेजारी मिळालेल्या अळ्या गोळा करून रॉकल मिश्रीत पाण्यात टाकून माराव्यात.
  9. आडसाली ऊसाची लागण केल्यानंतर जमिनीत वापसा आल्यानंतर (साधारण ३-४ दिवसांनी) ऊसातील तणांच्या बंदोबस्तासाठी ५० ग्रॅम अॅट्राझिन किंवा १५ ग्रॅम मेट्रीब्युझीन १० लिटर पाण्यात मिसळून संपुर्ण क्षेत्रावर फवारणी करावी.

- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

अधिक वाचा: तुकड्या तुकड्याने एफआरपी देण्याचा निर्णय चुकीचा; उल्लंघन कराल तर कोर्टात खेचू

Web Title: Are you planting sugarcane in Adsali? How will you plan? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.