Lokmat Agro >स्मार्ट शेती > कीड नियंत्रणासाठी बिनखर्चिक, नैसर्गिक आणि झटपट तयार होणारा उपाय; वाचा सविस्तर

कीड नियंत्रणासाठी बिनखर्चिक, नैसर्गिक आणि झटपट तयार होणारा उपाय; वाचा सविस्तर

An inexpensive, natural and quick solution for crop pest control; Read in detail | कीड नियंत्रणासाठी बिनखर्चिक, नैसर्गिक आणि झटपट तयार होणारा उपाय; वाचा सविस्तर

कीड नियंत्रणासाठी बिनखर्चिक, नैसर्गिक आणि झटपट तयार होणारा उपाय; वाचा सविस्तर

पावसाळी हवामानामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो.

पावसाळी हवामानामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो.

शेअर :

Join us
Join usNext

pakshi thanbe पावसाळी हवामानामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो.

शेतकऱ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी कीड-रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पक्ष्यांची भूमिका महत्वाची ठरते. या पक्ष्यांना शेतात आकर्षित करण्यासाठी शेतात पक्षी थांबे तयार केले तर मोठ्या प्रमाणात किडींचे प्रमाण कमी होते.

पक्षी कसे करतात संरक्षण?
◼️ पूर्वी शेतीच्या परिसरात भरपूर प्रमाणात चिमण्या, कावळे, पोपट, कबुतर, मैना, साळुंकी असे कितीतरी पक्षी दिसायचे.
◼️ हानिकारक किडींपासून पिकाचे संरक्षण करण्यामध्ये हे पक्षी महत्वाचे ठरतात. सुमारे २० टक्के पक्षी मांसाहारी आहेत.
◼️ गायबगळे, वेडा राघू, खाटीक, कोतवाल यांसारखे अनेक पक्षी शेतांमधील अळ्या व किडी वेचून खातात.
◼️ पक्ष्यांना जर किडी, अळ्या उपलब्ध झाल्या तर ते पिकांचे नुकसान करीत नाहीत.
◼️ सुमारे २० टक्के नियंत्रण पक्ष्यांमार्फत होऊ शकते.

कसे लावाल सापळे?
◼️ चार ते पाच फूट उंच काठी घेऊन 'इंग्रजी टी' अक्षराप्रमाणे पक्ष्यांना बसण्यासाठी थांबे तयार करावेत.
◼️ शेताच्या मध्यापेक्षा बांधावर आणि झाडाच्या जवळ किडींचे प्रमाण कमी असते.
◼️ त्यामुळे कीड रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पक्ष्यांची भूमिका महत्वाची ठरते आहे.
◼️ या पक्ष्यांना शेतात आकर्षित करण्यासाठी एका एकरात जवळजवळ दहा पक्षी थांबे उभारावेत.

पक्षी थांब्याचे फायदे
◼️ या ठिकाणी बसलेले पक्षी पिकांवरील अळ्या खातात. पिकांवरील अळ्या खाल्ल्यामुळे पिकांचे संरक्षण होते.
◼️ हे थांबे पक्ष्यांसाठी नैसर्गिक अधिवासासारखे काम करतात. ज्यामुळे परिसंस्थेतील जैवसाखळी सुदृढ राहते.
◼️ रासायनिक औषधांऐवजी पक्ष्यांकडून कीड नियंत्रण झाल्याने शेती खर्च कमी होतो.
◼️ नैसर्गिक उपायांमुळे पर्यावरणाला धोका पोहोचत नाही.
◼️ किडींच्या प्रादुर्भावामुळे होणारे पिकांचे नुकसान टाळून उत्पादन वाढते.

अधिक वाचा: ग्रामीण शेतरस्ते, पाणंद रस्ते, शिव रस्त्यांचे होणार डिजिटल अभिलेख; शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?

Web Title: An inexpensive, natural and quick solution for crop pest control; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.