Lokmat Agro >स्मार्ट शेती > Amba Fal Mashi : आंब्यातील फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करा एकदम कमी खर्चाचा सोपा उपाय

Amba Fal Mashi : आंब्यातील फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करा एकदम कमी खर्चाचा सोपा उपाय

Amba Fal Mashi : To prevent the infestation of fruit flies in mangoes, follow this simple and low-cost solution | Amba Fal Mashi : आंब्यातील फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करा एकदम कमी खर्चाचा सोपा उपाय

Amba Fal Mashi : आंब्यातील फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करा एकदम कमी खर्चाचा सोपा उपाय

Mango Fruit Fly फळमाशी ही कीड असून सर्व वेलवर्गीय फळभाज्या तसेच फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. आंबा पिकात या माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.

Mango Fruit Fly फळमाशी ही कीड असून सर्व वेलवर्गीय फळभाज्या तसेच फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. आंबा पिकात या माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.

शेअर :

Join us
Join usNext

फळमाशी ही कीड असून सर्व वेलवर्गीय फळभाज्या तसेच फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. आंबा पिकात या माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे.

फळमाशीची ओळख
- फळमाशीच्या जीवनक्रमात अंडी, अळी, कोष व माशी, अशा चार अवस्था असतात. 
- किडीची माशी आकाराने घरमाशीएवढी असते.
- तिचे पंख तपकिरी रंगाचे असून छातीवर पिवळसर पोपटी रंगाचे अर्धगोलाकार पट्टे असतात.
- फळमाशीची अंडी पांढरी, एक मि.मी. लांबीची असतात.
- अळ्या पाठीमागच्या बाजूस निमुळत्या व रंगाने पिवळसर असून, त्यांना पाय नसतात.
- कोष दोन्ही बाजूस निमुळते व रंगाने पिवळसर तांबूस असतात.

नुकसान करण्याची पद्धत
-
फळमाशीची मादी तिच्या टोकदार अंडनलिकेच्या साहाय्याने फळांच्या सालीखाली छिद्रे पाडून अंडी घालते.
- एका छिद्रात एक ते पंधरा अंडी असू शकतात.
- एक मादी एका महिन्याच्या कालावधीमध्ये सुमारे २०० अंडी घालते.
- बाहेर पडलेल्या अळ्या फळातील गर खातात. त्यामुळे किडलेली फळे गळून पडतात.
- काही वेळेला मादीने अंडी घालण्यासाठी पाडलेल्या छिद्रातून फळात सूक्ष्म जंतूंचा शिरकाव होतो आणि त्यामुळे संपूर्ण फळे सडून जातात.
- अळ्यांची वाढ हवामानानुसार सुमारे एक ते तीन आठवड्यांत पूर्ण होते.
- पूर्ण वाढलेल्या अळ्या फळाला छिद्रे पाडून त्यातून बाहेर पडतात आणि परत अंडी घालण्यास सुरुवात करतात.
- हवामानानुसार फळमाशीच्या अनेक पिढ्या वर्षभरात होत असतात. त्यामुळे फळभाज्यांचे ३० ते ६० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान होते.
- फळमाशीमुळे किडलेली फळे पूर्ण वाढ न होता गळून पडतात. काही फळे वेडीवाकडी वाढतात व गळून पडतात.
- आंबा किंवा पेरूची किडलेली फळे बाहेरून चांगली दिसत असली तरी त्यामध्ये अळ्या असून, गराला एक प्रकाराचा उग्र वास येतो.

रक्षक सापळ्याचा प्रभावी वापर Rakshak Sapla
१) फळमाशीवर रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीद्वारे नियंत्रण करणे अवघड आहे. कारण अळ्या फळांच्या आत असतात.
२) फळमाशी नियंत्रणासाठी रक्षक सापळा फायदेशीर ठरत आहे.
३) फळमाशांना आकर्षित करण्यासाठी 'मिथाइल युजेनॉल' किंवा 'क्यू लुअर' हे रासायनिक द्रव्ये ठेवावे लागतात.
४) 'मिथाइल युजेनॉल' हे एका वेळेला साधारणत २ ते ३ मि. लि. एवढेच वापरावे लागते.
५) फळमाश्यांचा प्रादुर्भाव असेल अशा ठिकाणी सापळा ठेवावा. 

सापळा ठेवण्याची पद्धत
१) फळबागेत हा सापळा जमिनीपासून एक ते दोन फूट उंचीवर असावा.
२) आंब्याच्या बागेमध्ये झाडांच्या उंचीप्रमाणे साधारण जमिनीवरून दोन ते तीन मीटर उंचीवर राहील, असा टांगावा.
३) सापळा टांगता येणे जरुरीचे आहे. तो जमिनीवर किंवा उंच मचणावर ठेवू नये.
४) सापळा शक्यतो बागेच्या पूर्व बाजूस टांगावा.
५) मोठ्या क्षेत्रावर बाग असल्यास साधारण एका हेक्टर जागेसाठी चार सापळे वापरावेत.

अधिक वाचा: Amba Mohor Sanrakshan : आंबा पिकातील रसशोषक किडी व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी कशा घ्याल फवारण्या?

Web Title: Amba Fal Mashi : To prevent the infestation of fruit flies in mangoes, follow this simple and low-cost solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.