Join us
Daily Top 2Weekly Top 5

बारमाही उत्पादन देणाऱ्या भुईमूग पिकाची लागवड करताना करा 'ह्या' सुधारित तंत्राचा अवलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 10:12 IST

bhuimug lagvad भुईमूग हे तेलबिया पिकापैकी एक म्हत्वाचे पिक आहे. याची खरीप, रब्बी, उन्हाळी एकूणच बारमाही पीक म्हणून भुईमूग लागवड करता येते.

भुईमूग हे तेलबिया पिकापैकी एक महत्वाचे पिक आहे. याची खरीप, रब्बी, उन्हाळी एकूणच बारमाही पीक म्हणून भुईमूग लागवड करता येते.

जमिन व मशागत◼️ त्यासाठी जमीन मध्यम ते भारी व चांगली निचरा होणारी निवडावी.◼️जमीन खोल नांगरून भुसभुशीत करावी.◼️ शेवटच्या कुळवणीपूर्वी हेक्टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मातीत मिसळून घ्यावे.

वाणांची निवड◼️ भुईमुगाची लागवड करताना सुधारित जातींचा वापर करावा.◼️ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे 'कोकण गौरव', 'कोकण ट्रॉम्बे टपोरा', 'कोकण भूरत्न' या जाती विकसित करून प्रसारित केल्या आहेत.◼️ कोकणामध्ये या जाती खरीप तसेच रब्बी व उन्हाळी हंगामात लागवडीसाठी योग्य आहेत.

बियाणे व बीजप्रक्रिया◼️ लागवडीसाठी उत्तम आणि दर्जेदार बियाण्याची निवड करावी. हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे.◼️ मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बियाणाला थायरम ३ ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात चोळावे.◼️ या व्यतिरिक्त २० ग्रॅम रायझोबियम आणि ५० ग्रॅम स्फूरद वापरून बीजप्रक्रिया करावी.

लागवड पद्धती◼️ पेरणीपूर्व जमीन सपाट करून घ्यावी. आवश्यकता वाटल्यास पाण्याची एक पाळी द्यावी.◼️ पेरणी टोकन पद्धतीने करावी.◼️ उपट्या जातीची पेरणी दोन ओळीत ३० सेंटीमीटर अंतर ठेवून करावी.◼️ निमपसऱ्या, पसऱ्या जातीसाठी दोन ओळीतील अंतर १० ते १५ सेंटीमीटर ठेवावे.

प्लास्टिकचे आच्छादनाचा वापर◼️ कोकणात भुईमुगापासून अधिक उत्पादन व नफा मिळविण्यासाठी पिकाची लागवड रुंद वाफा व सरीवर ८० सेंटीमीटर बाय २० सेंटीमीटर अंतरावरून करून सात मायक्रॉन जाडीचे पारदर्शक प्लास्टिकचे आच्छादन करावे.◼️ तण नियंत्रणासाठी प्लास्टिक आच्छादन फायदेशीर ठरत आहे.

पाणी व्यवस्थापन◼️ प्लास्टिक आच्छादनाचा वापर केल्यामुळे पिकास पाणी कमी लागते. त्यामुळे पाण्याच्या १ ते २ पाळ्या कमी लागतात.◼️ पिकाच्या वाढीच्या कालावधीत दोन पाळ्यांतील अंतर १५ ते २० दिवस ठेवावे.◼️ मात्र, पीक फुलोऱ्यात असताना तसेच शेंगा भरण्याच्या वेळेस पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर १२ ते १५ दिवस असावे.◼️ त्यामुळे पिकाला ते ९ पाण्याच्या पाळ्या पुरेशा आहेत.◼️ भुईमुगाच्या प्लास्टिक आच्छादन तत्रज्ञानाचा वापर करून हेक्टरी ४५ ते ५० क्विंटल उत्पादन मिळते.

अधिक वाचा: ट्रम्पचा झटका कापूस, सोयाबीन अन् इथेनॉल उत्पादकांना फटका; शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार

English
हिंदी सारांश
Web Title : Year-round Groundnut Cultivation: Adopt These Improved Techniques for Higher Yields

Web Summary : Grow groundnuts year-round with improved techniques. Select well-drained soil, use improved varieties like 'Konkan Gaurav'. Seed treatment with Thiram and Rhizobium is crucial. Employ plastic mulching for weed control and water conservation, boosting yields to 45-50 quintals per hectare.
टॅग्स :शेतीशेतकरीपीकपीक व्यवस्थापनलागवड, मशागतपेरणीकोकणखरीपरब्बी