Lokmat Agro >स्मार्ट शेती > शेततळ्यात प्लास्टिक अस्तरीकरण करण्यास मिळतंय १ लाखाचे अनुदान; वाचा सविस्तर

शेततळ्यात प्लास्टिक अस्तरीकरण करण्यास मिळतंय १ लाखाचे अनुदान; वाचा सविस्तर

A subsidy of Rs 1 lakh is being provided for plastic lining in farm ponds; Read in detail | शेततळ्यात प्लास्टिक अस्तरीकरण करण्यास मिळतंय १ लाखाचे अनुदान; वाचा सविस्तर

शेततळ्यात प्लास्टिक अस्तरीकरण करण्यास मिळतंय १ लाखाचे अनुदान; वाचा सविस्तर

shet tale plastic anudan शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अनुदानांची सुविधा उपलब्ध आहे. यात शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी १ लाख रुपये अनुदान दिली जाते. या पॅकेज अंतर्गत शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यात येते.

shet tale plastic anudan शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अनुदानांची सुविधा उपलब्ध आहे. यात शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी १ लाख रुपये अनुदान दिली जाते. या पॅकेज अंतर्गत शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यात येते.

शेअर :

Join us
Join usNext

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी महत्त्वाची योजना आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक सिंचन सुविधांची निर्मिती करणे आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य पाण्याची सुविधा मिळेल आणि त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल व ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.

या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अनुदानांची सुविधा उपलब्ध आहे. यात शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी १ लाख रुपये अनुदान दिली जाते. या पॅकेज अंतर्गत शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यात येते.

पात्रता निकष
१) लाभार्थी अनुसूचित जाती/नवबौद्ध शेतकरी असावा.
२) जात प्रमाणपत्र असावे.
३) नवीन विहीरचा लाभ घेण्यासाठी किमान ०.४० हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
४) सामुहिक शेतजमीन किमान ०.४० हेक्टर धारण करणारे एकत्रित कुटुंब लाभ घेऊ शकते.
५) इतर घटकांसाठी किमान ०.२० हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
६) कमाल शेतजमीन मर्यादा ६.०० हेक्टर आहे.
७) सातबारा आणि ८-अ उतारा आवश्यक आहे.
८) आधार कार्ड आवश्यक आहे.
९) बँक खाते आधार कार्डाशी संलग्न असावे.
१०) स्व. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य.
११) वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असावे.
१२) उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांकडून मिळवावा लागेल.
१३) ग्रामसभेची शिफारस आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा?
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागतो.
- वेबसाईट: https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer
- ऑनलाईन अर्ज भरल्यावर लाभार्थीची निवड लॉटरी पद्धतीने होते.
- सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
- जिल्हास्तरीय समितीकडून मंजूरी मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना अनुदान मिळेल.

आवश्यक कागदपत्रे
१) सातबारा दाखला आणि ८-अ उतारा.
२) ६ ड उतारा (फेरफार)
३) जात प्रमाणपत्र.
४) तहसीलदारांकडील उत्पन्नाचा दाखला.
५) आधार कार्डाची छायांकित प्रत.
६) बँक पासबुकाची छायांकित प्रत.

संपर्क
अधिक माहितीसाठी आपल्या जवळील कृषी सहाय्यक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधू शकता किंवा कृषी अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडेही संपर्क साधू शकता.

अधिक वाचा: Vihir Anudan Yojana : उन्हाळा आलाय.. जुन्या व नव्या विहिरीचे काम करताय मग घ्या अनुदान; वाचा सविस्तर

Web Title: A subsidy of Rs 1 lakh is being provided for plastic lining in farm ponds; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.