सुक्या चाऱ्याचे जनावरांच्या आहारात मोठ्या प्रमाणावर महत्त्व आहे. सुक्या चाऱ्यात मुख्यतः कडबा, भुसा, चुनी यासारखे पदार्थ असतात.
यामुळे जनावरांच्या रवंथ क्रियेला उत्तेजन मिळते आणि पचन प्रक्रिया सुधारते. सुक्या चाऱ्याचा उपयोग जनावरांच्या संपूर्ण पोषणतत्त्वांच्या संतुलनासाठी देखील होतो.
सुक्या चाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. फायबर्स पाचनसंस्थेच्या कार्यात मदत करतात. यामुळे जनावरांचे पचन व्यवस्थित होते आणि शरीरातील पोषणद्रव्यांचे योग्य पद्धतीने अवशोषण होते.
फायबर्समुळे रवंथ क्रिया अधिक कार्यक्षम होते. ज्यामुळे दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन वाढते. यासाठी सुक्या चाऱ्याचा आहारात समावेश आवश्यक आहे.
अलीकडे, टीएमआर (Total Mixed Ration) हे एक नवीन वैरणीची पद्धत लोकप्रिय होऊ लागली आहे. टीएमआर मध्ये सुक्या चारा, हिरवी वैरण, खुराकाचा आणि इतर पोषक घटकांचे एकत्रित मिश्रण करून जनावरांना दिले जाते.
यामुळे जनावरांना सर्व आवश्यक पोषण मिळते. हे मिश्रण जनावरांच्या शरीराला पूर्णत: आवश्यक असलेले सर्व घटक पुरवते. परिणामी, जनावरे निरोगी, सदृढ आणि अधिक उत्पादनक्षम होतात.