Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > कृषी योजनांचे अनुदान आले, मात्र पूर्वसंमतीची प्रक्रिया थांबली, केवळ यांनाच मिळणार अनुदान 

कृषी योजनांचे अनुदान आले, मात्र पूर्वसंमतीची प्रक्रिया थांबली, केवळ यांनाच मिळणार अनुदान 

latest news Mahdbt scheme Grants for agricultural schemes but the prior approval process has been stopped | कृषी योजनांचे अनुदान आले, मात्र पूर्वसंमतीची प्रक्रिया थांबली, केवळ यांनाच मिळणार अनुदान 

कृषी योजनांचे अनुदान आले, मात्र पूर्वसंमतीची प्रक्रिया थांबली, केवळ यांनाच मिळणार अनुदान 

Mahadbt Scheme : या पूर्वसंमतीनंतरच साहित्याची खरेदी होते. त्याला अनुदान दिले जाते.

Mahadbt Scheme : या पूर्वसंमतीनंतरच साहित्याची खरेदी होते. त्याला अनुदान दिले जाते.

यवतमाळ : कृषी साहित्याच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान दिले जाते. तत्पूर्वी शेतकऱ्यांना पूर्वसंमती घ्यावी लागते. या पूर्वसंमतीनंतरच साहित्याची खरेदी होते. त्याला अनुदान दिले जाते. ही संपूर्ण प्रक्रियाच थांबल्याने जिल्ह्यातील ११ हजार शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातूनच शेतकऱ्यांपुढे विविध संकटे उभी ठाकली आहेत.

सिंचनासाठी ड्रिप आणि स्प्रिंकलर खरेदीसाठी ७५ ते ९० टक्के अनुदान दिले जाते. यासाठी सिंचन साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो. या पोर्टलवर अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते. ही निवड प्रक्रिया झाल्यानंतरच पूर्वसंमतीची प्रक्रिया पार पाडली जाते.

मात्र, नोव्हेंबर २०२५ पासून महाडीबीटी पोर्टलवरील निवड प्रक्रियाच थांबली आहे. त्यामुळे पूर्वसंमती आणि अनुदान वितरणालाही ‘ब्रेक’ लागला आहे. त्यातून नव्याने सिंचन विहिरी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सिंचन साहित्याच्या खरेदीला ‘ब्रेक’ लागणार आहे. त्यातून शेतकऱ्यांमध्ये संताप नोंदविला जात आहे.

यांत्रिकीकरणाचे काम रखडले
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणासाठी चार हजार ३६६ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहे. त्यामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पेरणी यंत्र आणि इतर सामुग्रीचा समावेश आहे. या शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सहमती दर्शविली. मात्र, महाडीबीटी पोर्टलवरून पूर्वसंमती प्रक्रियेचे कामच थांबविले गेले आहे. त्यामुळे अर्ज दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

भाऊसाहेब फुंडकर योजनाही अडचणीत
पूर्वसंमतीअभावी फळबाग लागवडीसाठीची भाऊसाहेब फुंडकर योजना चांगलीच अडचणीत आली आहे. त्याचा फटका सर्वच शेतकऱ्यांना बसणार आहे.
 

 

Read More :  जमिनीच्या नोंदीतील घोळ कशामुळे होतो, अशावेळी काय करावे, कुठे आणि कशी करावी दुरुस्ती

 

Web Title : कृषि सब्सिडी आई, पूर्व-अनुमति रुकी, केवल कुछ किसानों को लाभ।

Web Summary : यवतमाल के किसान कृषि सब्सिडी के लिए पूर्व-अनुमति रुकने से परेशान हैं। नवंबर 2025 से प्रक्रिया बंद है, जिससे सिंचाई, मशीनीकरण और बागवानी योजनाएं प्रभावित हैं। हजारों किसान प्रभावित, आक्रोश व्याप्त।

Web Title : Farm subsidy arrives, pre-approval paused, limited farmers to benefit.

Web Summary : Yavatmal farmers face hardship as pre-approval for agricultural subsidies halts. November 2025 onwards, the process stopped, impacting drip irrigation, mechanization, and horticulture schemes. Thousands are affected, causing frustration.