lokmat Supervote 2024
Lokmat Agro >स्मार्ट शेती > पावसामुळे आंबा डागळातोय कसे कराल व्यवस्थापन

पावसामुळे आंबा डागळातोय कसे कराल व्यवस्थापन

How to manage mango staining due to rain | पावसामुळे आंबा डागळातोय कसे कराल व्यवस्थापन

पावसामुळे आंबा डागळातोय कसे कराल व्यवस्थापन

कोकणात काही ठिकाणी दोन दिवस पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे आर्द्रतेमध्ये वाढ झाली आहे. या पावसामुळे आंब्यावर करपा रोगाचे काळे डाग पडण्याची भीती आहे.

कोकणात काही ठिकाणी दोन दिवस पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे आर्द्रतेमध्ये वाढ झाली आहे. या पावसामुळे आंब्यावर करपा रोगाचे काळे डाग पडण्याची भीती आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कोकणात काही ठिकाणी दोन दिवस पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे आर्द्रतेमध्ये वाढ झाली आहे. या पावसामुळे आंब्यावर करपा रोगाचे काळे डाग पडण्याची भीती आहे. तसेच देठकूज या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

आंबा टिकण्यासाठी बुरशीनाशकाची फवारणी करणे उपयुक्त होईल, असा सल्ला दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सांगितले आहे. दोन दिवस कोकणातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती.

काही ठिकाणी तुरळकर तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. पावसामुळे आंबा पिकावर परिणाम होण्याची शक्यता विद्यापीठाकडून वर्तविण्यात आली आहे.

पावसामुळे आर्द्रतेमध्ये वाढ झाली असून, आंब्यावर करपा रोगाचे काळे डाग तसेच देठकूज या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा पिकाचे संरक्षण करण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन कृषी विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

अशी घ्या काळजी
● शेतकऱ्यांनी अझॉक्सीस्ट्रॉबिन २३.५ ई.सी. १० मिली. प्रती १० लिटर पाण्यात या बुरशीनाशकाची स्टिकर मिसळून फवारणी करावी.
● आर्द्रतेमध्ये वाढ झाल्यामुळे २ फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यासाठी हेक्टरी ४ नग रक्षक सापळे वेगवेगळ्या ठिकाणी झाडांच्या खालील बाजूंच्या फांद्यावर लावावेत.
● फळगळ झालेली आंबा फळे गोळा करून नष्ट करावीत आणि बागेत स्वच्छता ठेवावी.
● तयार झालेली आंबा फळे काढताना सकाळी १० वाजेपर्यंत व सायंकाळी ४ नंतर नूतन झेल्याच्या सहाय्याने काढणी करावी.
● काढणी पश्चात बुरशीजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी काढलेली फळे लगेचच ५० अंश सेल्सिअस पाण्यात १० मिनिटे बुडवून काढावीत व नंतर सावलीत वाळवावीत.
● तसेच फळांची वाहतूक करताना रात्रीच्या वेळीस करावी.

अधिक वाचा: आंबा पिकातील फळमाशीचे व्यवस्थापन करण्यासाठी सोपे उपाय

 

Web Title: How to manage mango staining due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.