lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > रेशीम शेतकऱ्यांना आनंदाची बातमी; कोष विक्रीसाठी सोलापुरात हिरजमध्ये नवीन मार्केट

रेशीम शेतकऱ्यांना आनंदाची बातमी; कोष विक्रीसाठी सोलापुरात हिरजमध्ये नवीन मार्केट

Good news for silk farmers; New market in Hiraj in Solapur for cacoons sale | रेशीम शेतकऱ्यांना आनंदाची बातमी; कोष विक्रीसाठी सोलापुरात हिरजमध्ये नवीन मार्केट

रेशीम शेतकऱ्यांना आनंदाची बातमी; कोष विक्रीसाठी सोलापुरात हिरजमध्ये नवीन मार्केट

कोष विक्रीसाठी बाजारपेठ सोलापुरात म्हणजे हिरज येथेच करण्यात आली आहे. जालन्यानंतर सोलापूर शहरालगत हिरज येथेच कोष खरेदीची बाजारपेठ यावर्षीपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

कोष विक्रीसाठी बाजारपेठ सोलापुरात म्हणजे हिरज येथेच करण्यात आली आहे. जालन्यानंतर सोलापूर शहरालगत हिरज येथेच कोष खरेदीची बाजारपेठ यावर्षीपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

शेअर :

Join us
Join usNext

अरुण बारसकर
सोलापूर : याअगोदर रेशीम कोषाची विक्री करण्यासाठी इतर राज्यांत जावे लागायचे. मात्र, कोष विक्रीसाठी बाजारपेठ सोलापुरात म्हणजे हिरज येथेच करण्यात आली आहे. जालन्यानंतर सोलापूर शहरालगत हिरज येथेच कोष खरेदीची बाजारपेठ यावर्षीपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

नैसर्गिक आपत्ती आली तरी थोडेफार नुकसान पोहोचेल. मात्र, पीक उत्पादन देणार. तुमच्याकडे बऱ्यापैकी पाणी असेल तर अधिकच उत्तम. तुम्ही तुतीची अर्थात रेशीमशेती करू शकता. मात्र, मागील वर्षीचा कमी पाऊस व यंदाच्या कडक उन्हाळ्यात आहे त्या रेशीमशेतीला झळ बसण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना जसे सोयाबीन पीक सोईचे वाटत आहे, तसे अलीकडे रेशीम पीक क्षेत्र वाढताना दिसत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात तुती लागवड क्षेत्र एक हजार हेक्टरपर्यंत गेले आहे. वादळ-वारे, गारपीट अथवा इतर नैसर्गिक आपत्ती आली तरी तुतीच्या पिकाचे फार असे नुकसान होत नाही.

पावसाच्या पाण्यावर अवलंबून दोन-तीन उत्पादने, तर पाणी उपलब्ध असेल तर वर्षभरात पाच-सहा उत्पादने घेता येतात. अगदी कमी खर्चात तुतीची शेती करता येते. अलीकडे अल्पभूधारक शेतकऱ्यांना लागवड खर्च शासन देत आहे. जिल्ह्यात सध्या १५५ गावांत ८१९ शेतकऱ्यांकडे ९७८ एकर तुतीची लागवड आहे.

त्यातून शेतकरी रेशीम कोषाच्या माध्यमातून उत्पादन घेतात. मात्र, मागील वर्षीचा कमी पाऊस व सध्याचा उन्हाचा कडक तडाखा लक्षात घेतला तर तुतीच्या शेतीला पाण्याअभावी फटका बसू शकतो.

नव्याने ५०० एकरांसाठी नोंदणी...
येत्या जूननंतर पावसाच्या भरवशावर तुतीची शेती करण्यासाठी साडेचारशेहून अधिक शेतकयांनी रेशीम कार्यालयाकडे नोंद केली आहे. साडेचारशेहून अधिक शेतकऱ्यांनी ५०० एकरांपेक्षा अधिक एकरात तुतीची लागवड करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी विनीत पवार यांनी दिली.

Web Title: Good news for silk farmers; New market in Hiraj in Solapur for cacoons sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.