lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > निळवंडेत राहिला १९, तर भंडारदरा धरणात ३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा

निळवंडेत राहिला १९, तर भंडारदरा धरणात ३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा

19 per cent of usable water remained in Nilwande, while 35 per cent of usable water in Bhandardara dam | निळवंडेत राहिला १९, तर भंडारदरा धरणात ३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा

निळवंडेत राहिला १९, तर भंडारदरा धरणात ३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा

जलसंजीवनी ठरलेल्या भंडारदरा धरणात ३५, आढळा धरणात ४७ व निळवंडे धरणात केवळ १९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

जलसंजीवनी ठरलेल्या भंडारदरा धरणात ३५, आढळा धरणात ४७ व निळवंडे धरणात केवळ १९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

शेअर :

Join us
Join usNext

जलसंजीवनी ठरलेल्या भंडारदरा धरणात ३५, आढळा धरणात ४७ व निळवंडे धरणात केवळ १९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. आढळा धरणाच्या पाणलोट काठावरील देवठाण गावच्या सात वाड्या, मुथाळणे गावठाणसह तीन वाड्या, कळंब परतनदरा, मन्याळे गावठाणसह गवारवाडी या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

मन्याळेची विलासनगर व पिसेवाडी येथेदेखील लवकरच टँकर चालू होणार आहे. मुथाळणे गाव तसेच पागीरवाडी, कानडवाडी, नायकरवाडी येथे टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. देवठाण गावच्या मोहरेवस्ती, पथवेवस्ती, उघडेवस्ती, गिन्हेवाडी, गांगडवाडी या पाच वाड्यांवर टँकर सुरू आहेत.

विशेष म्हणजे या वाड्या आढळा धरणाच्या जलाशयाच्या अगदी जवळ टेकड्यांवर वसलेल्या आहेत. धरण उशाला अन् कोरड घशाला अशी या वाड्यांची स्थिती आहे. गतवर्षी मे अखेर थोडी पाणीटंचाई जाणवली, यंदा मात्र एप्रिलमध्येच पाणी टंचाईने डोके वर काढले आहे.

तालुक्यातील घोटी शिळवंडी, सांगवी, पाडोशी, अंबित, शिरपुंजे, बलठण, कोथळे, टिटवी, बोरी, बेलापूर बदगी, वाकी, पिंपळगाव खांड या बारा लघुपाटबंधारे तलावात दहा वीस टक्क्यांपेक्षा कमी पाणी असून, काहींनी तळ गाठला आहे.

वाकी बंधाऱ्यात ४८ टक्के पाणी शिल्लक आहे. मुळा नदीवरील शिसवंद ते पिंपळदरी दरम्यानच्या खडकी, साकीरवाडी, पैठण, पाडाळणे, धामणगाव पाट, कोथळे, टिटवी, बोरी, बेलापूर बदगी, वाकी, पिंपळगाव खांड या बारा लघुपाटबंधारे तलावात दहा वीस टक्क्यांपेक्षा कमी पाणी असून, काहींनी तळ गाठला आहे.

वाकी बंधाऱ्यात ४८ टक्के पाणी शिल्लक आहे. मुळा नदीवरील शिसवंद ते पिंपळदरी दरम्यानच्या खडकी, साकीरवाडी, पैठण, पाडाळणे, धामणगाव पाट, नसल्याने शेतकरीवर्ग आता चिंतेत आहे.

जलजीवन मिशनसारखी योजना उन्हाळ्यापूर्वी कार्यान्वित झाली असती, तर प्रत्येक गावात किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असता. मात्र, जलजीवन योजनेचे काम बहुतेक ठिकाणी अपूर्ण व दर्जाहीन झालेले आहे.

सध्या देवठाणच्या ७ वाड्या, मन्याळे गावठाण व १ वाडी, मुथाळणे गावठाण व ३ वाड्या येथे टँकर चालू आहेत. कळंब व केळी ओतूरचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. विलासनगर व पिसेवाडी येथेदेखील टँकर सुरू होणार आहेत. पाणीटंचाई निवारणासाठी पंचायत समिती प्रशासन सजग आहे. - विकास चौरे, गटविकास अधिकारी, अकोले

भंडारदरा धरणाचा जलसाठा ४१५० दशलक्ष घनफूट इतका आहे. ८३२० दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेच्या निळवंडे जलाशयात १८४३ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे. १०६० दशलक्ष घनफूटच्या आढळा मध्यम जलसिंचन प्रकल्पात ५४७ दशलक्ष घनफूट पाणी आहे. - अभिजित देशमुख, सहायक अभियंता जलसंपदा

Web Title: 19 per cent of usable water remained in Nilwande, while 35 per cent of usable water in Bhandardara dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.