राज्याच्या तूर हंगाम अंतिम टप्प्यात असून येत्या १५ दिवसांत शेतकरीतूर विक्रीसाठी बाजारात दाखल होतील. ज्यामुळे येत्या काळात तूर दर कसे असतील याची उत्सुकता सर्वांना लागून आहे. याच अनुषंगाने आज जाणून घेऊया जानेवारी मध्ये तुर बाजार दर कसे असतील याचा आढावा!
तूर बाजारात सध्या मंद-स्थिर स्थिती जाणवत असून शेतकरी तूर विक्रीस न आणता रोखून ठेवत आहेत. तुरीचा हमीभाव ८,००० रुपये प्रतिक्विंटल असताना बाजारभाव ६,५०० ते ७,००० रुपये असल्याने शेतकरी तातडीने विक्री टाळत आहेत.
डाळींची मागणी मकर संक्रांतीपर्यंत कायम राहते. त्यामुळे १४ जानेवारीपर्यंत बाजारात खरेदीचा कल मजबूत राहील, त्यानंतर तुरीचा भाव घसरण्याचा अंदाज आहे.
नव्या तुरीची आवक
कर्नाटकातील नव्या तुरीची गुणवत्ता प्रामुख्याने मध्यम असल्याने उत्कृष्ट मालाला पुढील काळात अधिक मागणी वाढण्याची शक्यता आहे. हलक्या प्रतीच्या मालामुळे बाजारात प्रारंभी हलकी तेजी दिसते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
पुढील आठवड्याचा भाव अंदाज
लेमन तूर - ₹६,२५०
नागपूर बिल्टी - ₹६,६५०
१५ दिवसात चित्र स्पष्ट होणार!
• लेमन, सुडान आणि आफ्रिकन तुरीची आवक तसेच वापरही तेवढाच असल्याने बाजारात कोणताही दबाव नाही. स्थानिक जुन्या तुरीचा साठा अत्यल्प आहे. त्याचवेळी कर्नाटकातील नव्या हंगामात उत्पादन कमी असल्याच्या चर्चाना जोर असून पुढील १०-१५ दिवसांत याबाबत स्पष्टता येईल.
• दुसरीकडे विदर्भात हवामान पिकासाठी अनुकूल आहे. सरकारने हमीभावावर खरेदी वाढवली तर शेतकरी ६,५००-७,००० च्या बाजारभावात विक्री करणार नाहीत, असे स्पष्ट आहे. मागणी कायम राहिल्यास मोठी घसरण होणार नाही.
• कर्नाटकातील आवक वाढून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात माल बाजारात आणल्यास बाजारभावात किरकोळ घट संभवते; परंतु मोठ्या तेजी-घसरणीचे कारण नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
• कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा तसेच बर्मा व आफ्रिकेतूनही मालाची आवक सुरू आहे. डिसेंबरमध्ये मागणी वाढण्याची शक्यता असल्याने घसरणीच्या काळात व्यापाऱ्यांकडून खरेदी केली जाणार आहे.
