राज्यात एकूण ३०५ कृषि उत्पन्न बाजार समित्या असून सदर बाजार समित्यांचे ६२५ उपबाजार आवार कार्यरत आहेत. उत्पन्नानुसार बाजार समित्यांचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यात आलेले आहे.
पणन विभागामार्फत पुढील १०० दिवसांत करावयाच्या कृती कार्यक्रमात "राज्यातील सध्याच्या १ कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या बाजार समित्यांचे रु. १ ते २.५ कोटी, रु. २.५ कोटी ते ५ कोटी, रु. ५ कोटी ते १० कोटी, रु. १० कोटी ते २५ कोटी व रु. २५ कोटी पेक्षा जास्त असे उपवर्गीकरण" हा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे.
त्यानुसार पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दि.२७.०२.२०२५ रोजीच्या पत्रान्वये "अ" वर्गीय कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे उपवर्गीकरणासह "ब", "क" व "ड" बाजार समित्यांचे वर्गीकरणाबाबत प्रस्ताव शासनास सादर केला होता.
पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शिफारस केल्यानुसार कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे एकूण उत्पन्न, एकूण खर्च, वाढावा व तूट या अनुषंगाने खालीलप्रमाणे सुधारित वर्गीकरण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
अ.क्र | वर्गवारी | उत्पन्न मर्यादा | बाजार समित्यांची संख्या |
१ | अ***** (पंच तारांकित) | रुपये २५ कोटी पेक्षा जास्त | ०५ |
२ | अ**** | रुपये १० कोटी ते रुपये २५ कोटी | १५ |
३ | अ*** | ५ कोटी ते रुपये १० कोटी | २३ |
४ | अ** | रुपये २.५ कोटी ते रुपये ५ कोटी | ६० |
५ | अ* | रुपये १ कोटी ते २.५ कोटी | ९१ |
६ | ब | रुपये ५० लाख ते रुपये १ कोटी | ५४ |
७ | क | रुपये २५ लाख ते ५० लाख | २७ |
८ | ड | रुपये २५ लाख पेक्षा कमी | ३० |
एकूण | ३०५ |
राज्यातील कोणती कृषी उत्पन्न बाजार समिती कोणत्या वर्गात हे पाहण्यासाठी शासन निर्णय (पान क्रमांक ३ च्या पुढे पहा)
अधिक वाचा: शेतकरी अपघात अनुदान योजनेसाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर; वारसांना मिळणार पैसे