Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > सांगली बाजार समितीत उच्चांकी दराने हळद सौद्याचा शुभारंभ; वाचा काय मिळाला दर?

सांगली बाजार समितीत उच्चांकी दराने हळद सौद्याचा शुभारंभ; वाचा काय मिळाला दर?

Turmeric deal launched at highest price in Sangli Market Committee; Read what price was obtained? | सांगली बाजार समितीत उच्चांकी दराने हळद सौद्याचा शुभारंभ; वाचा काय मिळाला दर?

सांगली बाजार समितीत उच्चांकी दराने हळद सौद्याचा शुभारंभ; वाचा काय मिळाला दर?

Halad Market सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंतदादा मार्केट यार्डमध्ये नवीन राजापुरी हळद सौद्याचा शुभारंभ बुधवारी पार पडला.

Halad Market सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंतदादा मार्केट यार्डमध्ये नवीन राजापुरी हळद सौद्याचा शुभारंभ बुधवारी पार पडला.

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंतदादा मार्केट यार्डमध्ये नवीन राजापुरी हळद सौद्याचा शुभारंभ बुधवारी पार पडला.

हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आणि उत्साही वातावरणात निघालेल्या सौद्यामध्ये राजापुरी हळदीला प्रति क्विंटल २८ हजार १ रुपये दर मिळाला.

पहिल्याच सौद्यात हळदीला सोन्याचा भाव मिळाला आहे. सांगली मार्केट यार्डात शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी हळद बाजारात सहा हजार २५ पोत्यांची मोठी आवक झाली.

यामध्ये जागणूर (ता. गोकाक, जि. बेळगाव) येथील शेतकरी कृष्णमूर्ती मारुती हनमनावर यांच्या हळदीला मनाली ट्रेडिंग कंपनीने प्रति क्विंटल २८ हजार १ रुपये या हंगामातील उच्चांकी दर देत खरेदी केली.

ही हळद सुपार्श्व ट्रेडिंग कंपनी, राजेंद्र बाळगोंडा पाटील यांच्या दुकानात विक्रीस ठेवण्यात आली होती. सौद्यात हळदीला किमान १३ हजार रुपये तर

कमाल २८ हजार १ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी पारदर्शक व्यवहार व स्पर्धात्मक दरांची परंपरा आहे.

यावेळी शशिकांत नागे, प्रशांत पाटील-मजलेकर, काडापा वारद, सचिव महेश चव्हाण, उपसचिव सुनील केळुसकर, अमरसिंह देसाई, मनोहर सारडा, दीपक चौगुले, श्रीकांत मर्दा, दिलीप आरवाडे, सतीश पटेल, नितीन गातील पाटील आदी उपस्थित होते.

बाजारात आवक वाढण्याची शक्यता
दर्जेदार हळदीला चांगला दर मिळत असल्याने आगामी काळात बाजारात आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली. बाजार समितीचे संचालक आनंदराव नलवडे यांच्या हस्ते सौद्याची सुरुवात केली.

अधिक वाचा: सातबारा उताऱ्यातील फेरफारच्या नोटिसा आता घरपोच मिळणार; भूमी अभिलेख विभागाचा 'हा' नवा प्रयोग

Web Title : सांगली बाजार में हल्दी की रिकॉर्ड नीलामी शुरू; क्या रही दर?

Web Summary : सांगली बाजार में राजापुरी हल्दी की नीलामी ₹28,001/क्विंटल पर शुरू हुई। 6,025 बैग आए। किसान कृष्णमूर्ति हनमनवर को सबसे ऊंची दर मिली, जिसे मनाली ट्रेडिंग कंपनी ने खरीदा। कीमतें ₹13,000 से ₹28,001 तक रहीं। आपूर्ति बढ़ने की उम्मीद है।

Web Title : Record turmeric auction starts at Sangli market; what was the rate?

Web Summary : Sangli market saw a high of ₹28,001/quintal for Rajapuri turmeric at auction. 6,025 bags arrived. Farmer Krishnamurti Hanamanavar achieved the top rate, bought by Manali Trading Company. Prices ranged from ₹13,000 to ₹28,001. Increased supply expected.