Lokmat Agro >बाजारहाट > पावसाळ्याच्या हंगामात दर वाढतात म्हणून राखून ठेवलेली तूर अखेर बाजारात; मंदावलेल्या बाजाराने शेतकऱ्यांना बसतोय फटका

पावसाळ्याच्या हंगामात दर वाढतात म्हणून राखून ठेवलेली तूर अखेर बाजारात; मंदावलेल्या बाजाराने शेतकऱ्यांना बसतोय फटका

tur, which was kept aside as prices increase during the monsoon season, is finally in the market; Farmers are being hit by the sluggish market | पावसाळ्याच्या हंगामात दर वाढतात म्हणून राखून ठेवलेली तूर अखेर बाजारात; मंदावलेल्या बाजाराने शेतकऱ्यांना बसतोय फटका

पावसाळ्याच्या हंगामात दर वाढतात म्हणून राखून ठेवलेली तूर अखेर बाजारात; मंदावलेल्या बाजाराने शेतकऱ्यांना बसतोय फटका

गतवर्षी खुल्या बाजारात जुलै महिन्यात तुरीला ११ हजार रुपये क्विंटलचे दर मिळाले होते. यावर्षी देखील तुरीच्या दरात वाढ होईल अशीच अपेक्षा शेतकऱ्यांना होती. यातून शेतकऱ्यांनी तूर राखून ठेवली. जुलै महिन्यात तूर विकायला काढली. याचवेळी तुरीची आयात झाली. बाजारात तुरीचे दर पडले.

गतवर्षी खुल्या बाजारात जुलै महिन्यात तुरीला ११ हजार रुपये क्विंटलचे दर मिळाले होते. यावर्षी देखील तुरीच्या दरात वाढ होईल अशीच अपेक्षा शेतकऱ्यांना होती. यातून शेतकऱ्यांनी तूर राखून ठेवली. जुलै महिन्यात तूर विकायला काढली. याचवेळी तुरीची आयात झाली. बाजारात तुरीचे दर पडले.

शेअर :

Join us
Join usNext

गतवर्षी खुल्या बाजारात जुलै महिन्यात तुरीला ११ हजार रुपये क्विंटलचे दर मिळाले होते. यावर्षी देखील तुरीच्या दरात वाढ होईल अशीच अपेक्षा शेतकऱ्यांना होती. यातून शेतकऱ्यांनी तूर राखून ठेवली. जुलै महिन्यात तूर विकायला काढली. याचवेळी तुरीची आयात झाली. बाजारात तुरीचे दर पडले. याचा फटका यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे.

पावसाळ्याच्या हंगामात तुरीचे दर वाढतात. यामुळे राखून ठेवलेली तूर जादा दर मिळवून देते. यातून पेरणीचा खर्च कमी करता येतो. याच प्रमुख उद्देशाने शेतकऱ्यांनी तूर राखून ठेवली. मात्र केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात तुरीची आयात केली. यातून तुरीचे दर ८ हजार रुपये क्विंटलवरून साडेसहा हजार रुपये क्विंटलपर्यंत खाली आले आहे. यात तुरीला क्विंटल मागे दोन हजार रुपयांचा फटका बसला आहे.

शुक्रवारी यवतमाळच्या बाजारात तुरीची ७०० क्विंटलपर्यंत आवक होती. मात्र शेतमालाला दरच मिळत नसल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा झाली. आयात होणाऱ्या शेतमालाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

४,४०० रुपयांवर सोयाबीनचे दर

तूरी सोबतच सोयाबीनची आवक बाजारात वाढली आहे. यातून खुल्या बाजारात सोयाबीनचे दर खाली घसरले आहे. हे दर ४,००० ते ४,४०० रुपये क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

हेही वाचा : अवर्षणाच्या फेऱ्यात मिळाली रेशीम शेतीची भक्कम साथ; कुप्पाच्या शेतकऱ्याने ७० गुंठ्यांत घेतले दहा लाखांचे उत्पन्न

Web Title: tur, which was kept aside as prices increase during the monsoon season, is finally in the market; Farmers are being hit by the sluggish market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.