Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajar Bhav : अक्कलकोट बाजार समितीत ३८ हजार क्विंटल तुरीची आवक; मिळतोय सर्वाधिक दर

Tur Bajar Bhav : अक्कलकोट बाजार समितीत ३८ हजार क्विंटल तुरीची आवक; मिळतोय सर्वाधिक दर

Tur Bajar Bhav : 38 thousand quintals of tur pigeon pea arrived in Akkalkot Market Committee; Getting the highest price | Tur Bajar Bhav : अक्कलकोट बाजार समितीत ३८ हजार क्विंटल तुरीची आवक; मिळतोय सर्वाधिक दर

Tur Bajar Bhav : अक्कलकोट बाजार समितीत ३८ हजार क्विंटल तुरीची आवक; मिळतोय सर्वाधिक दर

Tur Bajar Bhav अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या सिझनमध्ये आतापर्यंत तब्बल ३८ हजार क्विंटल तुरीची आवक झालेली आहे.

Tur Bajar Bhav अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या सिझनमध्ये आतापर्यंत तब्बल ३८ हजार क्विंटल तुरीची आवक झालेली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

शिवानंद फुलारी
अक्कलकोट : अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या सिझनमध्ये आतापर्यंत तब्बल ३८ हजार क्विंटल तुरीची आवक झालेली आहे.

शेतकऱ्यांना काही भागांत फटका तर काही भागांत चांगले उत्पादन मिळत आहे. चांगला दर मिळत असल्याने परजिल्ह्यातील शेतकरी आकर्षित होत आहेत. यंदा चांगला पाऊस झाल्याने तालुक्यात तुरीची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली होती.

तूर फुलोऱ्यात येताच नागणसूर, तोळणूर, जेऊर, उमरगे, रामपूर, गौडगाव, निमगाव विशेष करून नदीकाठच्या गावांच्या शिवारातील उभ्या तुरीच्या पिकावर अचानकपणे धुके आल्याने रोगराई पसरली.

यामुळे सत्तर टक्के क्षेत्रातील माल खराब निघत आहे. उर्वरित मैदर्शी, दुधनी, हंनूर, वागदरी, सलगर, तडवळ, करजगी भागांत उत्तम व चांगल्या दर्जाचे उत्पादन निघाले आहे. एकंदरीत उत्तम दर व भरघोस पीक निघाल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.

चार प्रकारची तूरबाजारात
अक्कलकोट बाजार समितीत तालुक्यासह तुळजापूर, आळंद, इंडी, अफझलपूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, उमरगा या भागांतून मोठ्या प्रमाणात तुरीची आवक आहे. पिंक्कू, जिभारजी ८११, मारुती, पांढरी अशी चार प्रकारची तूर बाजारात येत आहे. सर्वाधिक पसंती पिक्कू वाणाला आहे. येथून गाड्या भरून तूर जालना, जळगाव, नागपूर, अकोला, मध्य प्रदेश कटणी, रायपूर भाटापारा, छत्तीसगड या ठिकाणी जात आहे.

प्रति एकर ५ ते ७ क्विंटल उत्पादन
१) सरासरी प्रति एकर ५ ते ७ क्विंटल उत्पादन निघत आहे. अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज १५०० ते २००० क्विंटल तुरीचे आवक आहे.
२) आतापर्यंत ३८ हजार क्विंटल तुरीचे आवक झालेले आहे. प्रत्येक क्विंटलला ६५०० ते ८५०० इतकी दर मिळत आहे.
३) माणसाकडून केलेल्या राशीचे तुरीला उत्तम तर हार्वेस्टिंग मशीनद्वारे केलेल्या राशीत तुरीत तुकडा, कचरा, आर्द्रता, ओलावा अधिक प्रमाणात असतो. यामुळे दर कमी मिळत आहे.

मागील पाच दशकांत यंदा सर्वाधिक बंपर तुरीचे शेतकऱ्यांना उत्पादन मिळत आहे. धुके पडलेल्या काही भागांतून हलक्या प्रतीची तूर येत असून, दर कमी मिळत आहे. उर्वरित भागातून चांगल्या दर्जाची तूर येत आहे. काही दिवस सतत ८१०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. सर्वत्र गर्दी, कोट्यवधी रुपयांची उलाढाल यामुळे मार्केट यार्डात चांगले वातावरण निर्माण झाले आहे. - राहुल तेलुणगी, आडत व्यापारी

 अधिक वाचा: Harbhara Ghate Ali : हरभऱ्यावरील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी करा हे सोपे उपाय

Web Title: Tur Bajar Bhav : 38 thousand quintals of tur pigeon pea arrived in Akkalkot Market Committee; Getting the highest price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.