lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > विंचूरला कांद्याची विक्रमी आवक, कांदा बाजारभावही टिकून

विंचूरला कांद्याची विक्रमी आवक, कांदा बाजारभावही टिकून

Today's market price of onion was | विंचूरला कांद्याची विक्रमी आवक, कांदा बाजारभावही टिकून

विंचूरला कांद्याची विक्रमी आवक, कांदा बाजारभावही टिकून

लासलगावच्या उपबाजार समितीत आज २९ सप्टेंबर रोजी कांद्याची विक्रमी आवक झाली असून कालच्या तुलनेत बाजारभाव टिकून असल्याचे दिसून आले.

लासलगावच्या उपबाजार समितीत आज २९ सप्टेंबर रोजी कांद्याची विक्रमी आवक झाली असून कालच्या तुलनेत बाजारभाव टिकून असल्याचे दिसून आले.

शेअर :

Join us
Join usNext

विंचूर येथील कांदा व्यापाऱ्यांनी संपात सहभागी न होता, कालपासून पुन्हा कांदा खरेदीला सुरूवात केल्याने येथे परिसरातील शेतकऱ्यांसह जवळच्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला कांदा घेऊन चांगलीच गर्दी केली. त्यामुळे आज दिनांक २९ सप्टेंबर रोजी येथे विक्रमी कांदा आवक झाल्याची माहिती विंचूर बाजारसमितीचे सहसचिव अशोक गायकवाड यांनी दिली. 

आज येथे सकाळ आणि दुपारच्या सत्रात येथे एकूण उन्हाळ कांद्याची  १४९४ नग आवक झाली. सर्व मिळून एकूण १८ हजार क्विंटल आवक झाल्याची माहिती उपबाजारसमितीने कळवले आहे. 

आज सकाळी ९०५ नग  कांदा आवक झाली. सकाळच्या सत्रात कमीत कमी ११००, जास्तीत जास्त २४००, तर सरासरी २१०० रुपये प्रतिक्विंटल असे दर होते. दुपारी त्यात थोडीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.  एकूण दिवसभरात किमान ११००- जास्तीत जास्त  २५०० आणि सरासरी २१०० असे भाव होते.

दरम्यान अनेक दिवसांच्या खंडानंतर  लासलगाव उपबाजार समितीत कांदा लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मध्यंतरीच्या पावसाळी वातावरणाने अनेक शेतकऱ्यांचा कांदा खराब होत होता. मात्र आता त्यांना कांदा विकता येण्याची सोय झाल्याने त्यांच्यात उत्साहाचे वातावरण होते.

दुसरीकडे कालपासून विंचूर येथील व्यापारी वर्गाचेही कांदा खरेदीसाठी सहकार्य मिळत आहे. येथील कांदा व्यापाऱ्यांनी घेतलेल्या अनोख्या निर्णयामुळे ही कांदा खरेदी सुरू झाली आणि शेतकऱ्यांना पुन्हा आपला माल विकता येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये आज कांदा बाजार भाव असे होते

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत

कमी दर

जास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
 
कोल्हापूर---क्विंटल3419100026001800
अकोला---क्विंटल722150022001800
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल320250050003400
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल3450023001500
सोलापूरलालक्विंटल1237710032001600
जळगावलालक्विंटल534100021251550
साक्रीलालक्विंटल1505100023452000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल22120026001900
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल80080022761800
मंगळवेढालोकलक्विंटल108138025002200
सोलापूरपांढराक्विंटल23320044002300
नाशिकउन्हाळीक्विंटल239180025002250
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल18000110025012100
संगमनेरउन्हाळीक्विंटल476220026111405
कोपरगावउन्हाळीक्विंटल31552521252000

Web Title: Today's market price of onion was

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.