Join us
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ओल्या हळदीला मिळतोय चांगला भाव; काढणीला मजुरांची मात्र भासतेय अडचण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 13:50 IST

नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात हळदीच्या लोणच्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने त्या काळातही अनेक शेतकरी कच्ची हळद काढून विकतात. यावर्षी त्या कच्च्या हळदीलाही २ हजार ते २३०० रुपयांपर्यंत चांगला भाव मिळाला. आता निघत असलेल्या ओल्या हळदीलाही २३०० ते २५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.

जळगाव जिल्ह्याच्या निंभोरा बुद्रुक (ता. रावेर) येथे आणि केळीपट्टयात भरवशाचे पीक म्हणून केळीनंतर हळदीच्या पिकाला शेतकऱ्यांतर्फे प्राधान्य देण्यात येत आहे. सद्यस्थितीत उन्हाच्या वाढत्या तापमानासोबत हळद काढणीने वेग घेतला आहे.

साधारणतः मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणाऱ्या हळदी पिकाला वादळ, वारे, जोरदार पाऊस अथवा अन्य किडींचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने भरवशाचे पीक असलेले हळद केळीपट्टयात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यात २ हजार हेक्टर व त्यापेक्षा जास्त असलेले हळदीचे पीक एकट्या रावेर तालुक्यात लागवड केलेले आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात हळदीच्या लोणच्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने त्या काळातही अनेक शेतकरी कच्ची हळद काढून विकतात.

यावर्षी त्या कच्च्या हळदीलाही २ हजार ते २३०० रुपयांपर्यंत चांगला भाव मिळाला. आता निघत असलेल्या ओल्या हळदीलाही २३०० ते २५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.

मजुरांची भासतेय अडचण

अनेक शेतकऱ्यांना मजुरांची अडचण भासत असल्याने हळद उकळून कोरडी करण्यास अडचणी आहेत. अनेक शेतकऱ्यांचा सध्या फैजपूर, सावदा, रावेर, वाघोदा यांसह अन्य ठिकाणी विक्री करण्याकडे कल दिसून येत आहे.

शेतकऱ्यांकडून ओल्या हळदीला विक्रीची पसंती

१६ हजार ते १९ हजारापर्यंत सद्यस्थितीत कोरड्या हळदीला दर आहे. अनेक शेतकरी वसमत, सांगली ह्या हळदीच्या मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना दरवर्षी देत असतात.

ओल्या हळदीला उकळून कोरडी करण्याची प्रक्रिया खर्चीक, जास्त मजुरीची असल्याने शेतकरी ओली हळद स्थानिक व्यापाऱ्यांना देण्याचा जास्त कल आहे. सध्या ओल्या हळदीचे २३०० रुपयांपर्यंत भाव स्थिर आहेत. - अतुल भंगाळे, हळद व्यापारी, निंभोरा.

सध्या हळद काढणी सुरू असून एक दोन दिवसांत बॉयलरद्वारा हळद उकळून सुकविली जाईल. सध्या भाव चांगले आहे. - सुनील भागवत कोंडे, हळद उत्पादक शेतकरी, निंभोरा, ता. रावेर.

येत्यावर्षी पुन्हा लागवड वाढण्याची चिन्हे

• कापूस, मका, ज्वारी यांना मिळणारे बाजारभाव व दिवसेंदिवस त्यांचे घटत जाणारे उत्पन्न व सोबतच हळदीचे वाढलेले बाजारभाव यामुळे प्रामुख्याने हळद लागवड वाढून २०२५-२६ च्या खरीप हंगामात एकट्या रावेर तालुक्यात तब्बल १ हजार ५८५ हेक्टर हळद लागवड झालेली आहे.

• येत्यावर्षी पुन्हा लागवड वाढण्याची चिन्हे आहेत. रावेर तालुक्यात केळीनंतर हळदीचे क्षेत्र स्थिरावत आहे. काही अंशी जास्त लागवड असलेले शेतकरी हळद बॉइल करण्याच्या तयारीत असून त्यासाठी लागणारे बॉयलर, मजूर यांची जमवाजमव करीत आहेत.

• कोरड्या हळदीला १६ हजार ते १९ हजारपर्यंत असा दर आहे. अनेक शेतकरी वसमत, सांगली ह्या हळदीच्या मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना दरवर्षी देत असतात तर काही शेतकरी तेथील व्यापाऱ्यांच्या गोडाऊनलाही साठवून ठेवतात.

• चांगला भाव आल्यावर विक्री करतात. त्यामुळे केळीपट्ट्यात हळद भरवशाचे आणि नफ्याचे पीक ठरत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : परिस्थितीशी झुंज देत विजयालक्ष्मी यांची दुग्धव्यवसायात भरारी; आता महिन्याकाठी १ लाख रुपयांची कमाई

English
हिंदी सारांश
Web Title : Good Prices for Fresh Turmeric, Labor Shortage a Concern

Web Summary : Jalgaon farmers favor turmeric after bananas. Good prices for raw and fresh turmeric are encouraging, but labor shortages hamper processing. Many are selling fresh turmeric locally. Higher dry turmeric prices may increase planting next year.
टॅग्स :शेती क्षेत्रबाजारजळगावमराठवाडाविदर्भशेतकरीमार्केट यार्ड