Join us
Daily Top 2Weekly Top 5

यंदा माणदेशी ज्वारीच्या भाकरीला श्रीमंतीचा थाट; वाचा प्रतिकिलो काय दराने होतेय विक्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 10:39 IST

mandeshi jwari गतवर्षी कमी अधिक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे, तसेच बदलते हवामान आणि नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट झाली असल्याने, ज्वारीचे दर भडकले आहेत.

माण पूर्व भागात गतवर्षी कमी अधिक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे, तसेच बदलते हवामान आणि नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट झाली असल्याने, ज्वारीचे दर भडकले आहेत.

सरासरी ५० ते ६० रुपये किलो एवढ्या चढत्या दराने ज्वारीची विक्री खरेदी होत असल्याने सर्वसामान्यांची भाकर महाग झाली आहे.

एकेकाळी गरिबांचे अन्न समजली जाणारी ज्वारी आता आरोग्याप्रती जागरूक असलेल्या वर्गामुळे लक्झरी बनली आहे. पोषक तत्त्वांच्या खाणीमुळे ज्वारीच्या भाकरीची मागणी वाढली आहे.

दरांच्या बाबतीत मात्र ज्वारीने आता गव्हालाही मागे टाकले आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण अनिश्चित राहिल्याने ज्वारीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला.

रब्बी हंगामात ज्वारीचे घटलेले क्षेत्र, शेतकऱ्यांचा पेरणीबद्दल निरुत्साह आणि काही ठिकाणी पीक हाती न आल्याने बाजारात येणारी आवक कमी झाली.

तसेच, ज्वारीचा पट्टा समजला जाणाऱ्या सधन भागातून होणारी आवक घटल्याने स्थानिक बाजारात टंचाई निर्माण झाली आहे.

आजकालच्या धावपळीच्या जीवनात मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांमुळे नागरिक गव्हाच्या पोळीपेक्षा ज्वारीच्या भाकरीला अधिक पसंती देत आहेत. मात्र, आवक कमी आणि मागणी वाढल्याने दिवसेंदिवस दरात वाढ होत आहे.

वजन कमी करणे, पचन सुधारणे आणि फायबरच्या उपलब्धतेमुळे पोळीपेक्षा भाकरीचे महत्त्व वाढत आहे. ज्वारी पचायला हलकी आणि थंड असल्याने भाकरी खाण्यावर भर देत आहेत.

ज्वारीचे आरोग्याला होणारे फायदे◼️ पचनासाठी अत्यंत उत्तम असून, फायबरचा समावेश असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.◼️ मधुमेहात फायदेशीर ठरते.◼️ हृदयरोगामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी कमी राखण्यास उपयुक्त ठरते.◼️ शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळत असल्याने, फिटनेससाठी भाकरीलाच पसंती मिळत आहे.

अधिक वाचा: शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानभरपाई मिळणं झालं अवघड; 'या' दोन निकषांमुळे मिळणार नाही मदत

English
हिंदी सारांश
Web Title : High Demand Drives Up the Price of Sorghum Bread

Web Summary : Sorghum bread, once a poor man's food, is now a luxury due to increased health awareness and decreased production. Prices have surged, surpassing even wheat, due to erratic rainfall and reduced cultivation. Health benefits are fueling the demand.
टॅग्स :ज्वारीबाजारमार्केट यार्डआरोग्यआहार योजनामधुमेहशेतीशेतकरीरब्बीहृदयरोग