Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > दरवर्षी तेजीचा असलेला उन्हाळ हंगाम यंदा मात्र भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना ठरतोय निराशाजनक

दरवर्षी तेजीचा असलेला उन्हाळ हंगाम यंदा मात्र भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना ठरतोय निराशाजनक

The summer season, which is usually a booming season every year, is proving disappointing for vegetable farmers this year. | दरवर्षी तेजीचा असलेला उन्हाळ हंगाम यंदा मात्र भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना ठरतोय निराशाजनक

दरवर्षी तेजीचा असलेला उन्हाळ हंगाम यंदा मात्र भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना ठरतोय निराशाजनक

Vegetable Market : सध्या भाजीपाल्याच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. शेतकऱ्यांना मेथी दहा रुपयांत तीन जुड्या, वांगे दहा रुपयांत टोपलीभर, तर कोथिंबीर दहा रुपये किलो दराने व्यापाऱ्यांना विक्री करावी लागत आहे.

Vegetable Market : सध्या भाजीपाल्याच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. शेतकऱ्यांना मेथी दहा रुपयांत तीन जुड्या, वांगे दहा रुपयांत टोपलीभर, तर कोथिंबीर दहा रुपये किलो दराने व्यापाऱ्यांना विक्री करावी लागत आहे.

जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा परिसरात सध्या भाजीपाल्याच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. शेतकऱ्यांना मेथी दहा रुपयांत तीन जुड्या, वांगे दहा रुपयांत टोपलीभर, तर कोथिंबीर दहा रुपये किलो दराने व्यापाऱ्यांना विक्री करावी लागत आहे.

त्यामुळे काही उत्पादक शेतकऱ्यांनी कोंथिबीर आणि मेथीच्या शेतामध्ये जनावरे सोडणे पसंत केले आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या बाजारपेठेतही आपले उत्पादन नेऊन विकण्याचा प्रयत्न केला, तरीही अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या परिसरात पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने शेतकरी मुख्यत्वे नगदी पिकांसाठी भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतात.

मात्र, शेतकऱ्यांच्या मेहनतीला बाजारपेठेत योग्य किंमत न मिळाल्याने त्यांचे आर्थिक संकट वाढले आहे. दरम्यान राज्याच्या सर्व बाजारात सध्या भाजीपाला दरात मोठी मंदी दिसून येत आहे. ज्याचे मुख्य कारण म्हणजे वाढलेली आवक. त्यामुळे दरवर्षी तेजीचा हंगाम असलेले सध्याचे दिवस यंदा मात्र शेतकऱ्यांना निराशाजनक ठरत आहे. 

हेही वाचा : मंदीच्या लाटेत देखील 'हा' शेतकरी म्हणतोय मेथीची एक जुडी देतेय ५० रुपयांचे उत्पन्न; वाचा सविस्तर

Web Title : इस गर्मी में कीमतें गिरने से सब्जी किसानों को हो रहा है नुकसान।

Web Summary : जालना के सब्जी किसान कम कीमतों से परेशान हैं। मेथी तीन गुच्छे दस रुपये में, बैंगन एक टोकरी दस रुपये में और धनिया दस रुपये किलो बिक रहा है। कुछ किसान लाभ न होने के कारण अपने खेतों में मवेशियों को चरने दे रहे हैं, बाजार में अधिक आपूर्ति के कारण वित्तीय कठिनाई का सामना कर रहे हैं।

Web Title : Vegetable farmers face losses as prices plummet this summer.

Web Summary : Jalna's vegetable farmers are distressed by low prices. Methi sells for ten rupees for three bundles, eggplant for ten rupees a basket, and coriander for ten rupees a kilo. Some farmers are letting livestock graze their crops due to unprofitability, facing financial hardship due to market glut.