Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > दुधनीत तुरीच्या दराने नऊ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला; वाचा कमाल काय मिळाला दर?

दुधनीत तुरीच्या दराने नऊ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला; वाचा कमाल काय मिळाला दर?

The price of tur in milk crossed the mark of nine thousand rupees; Read what was the maximum price? | दुधनीत तुरीच्या दराने नऊ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला; वाचा कमाल काय मिळाला दर?

दुधनीत तुरीच्या दराने नऊ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला; वाचा कमाल काय मिळाला दर?

tur market केंद्र सरकारने महाराष्ट्रातील तूर खरेदी करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्यानंतर आता याचे सकारात्मक पडसाद उमटत आहेत.

tur market केंद्र सरकारने महाराष्ट्रातील तूर खरेदी करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्यानंतर आता याचे सकारात्मक पडसाद उमटत आहेत.

चपळगाव : केंद्र सरकारने महाराष्ट्रातील तूर खरेदी करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्यानंतर आता याचे सकारात्मक पडसाद उमटत आहेत.

तुरीला हमीभावापेक्षाही जास्तीचा दर मिळत असून, बुधवारी दुधनी मार्केट कमिटीत तुरीला प्रतिक्विंटल कमाल ९,४०० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे.

बुधवारचा दिवस अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचा ठरला. दुधनी येथील शांतलिंगेश्वर मार्केट कमिटीत तुरीला हमीभावापेक्षाही जास्तीचा दर मिळाला.

वास्तविक २०२४-२५ या वर्षासाठी केंद्र शासनाने तुरीसाठी ७,५५० रुपये प्रतिक्विंटल असा हमीभाव निश्चित केला होता, तर सन २०२५-२६ साठी तुरीला ८,००० रुपये असा दर निश्चित केला आहे.

बुधवारी झालेल्या सौद्यामध्ये तुरीच्या दराने हमीभाव पार केला. यामध्ये तुरीला किमान ७,४००, तर कमाल ९,४०० रुपये प्रतिक्विंटलचा विक्रमी दर मिळाला.

अलीकडच्या काळात दुधनी मार्केट कमिटीत सोलापूर, कलबुर्गी, लातूर, विजयपूर, धाराशिव, आदी जिल्ह्यांतील शेतकरी हे आपला शेतमाल विक्रीसाठी आणत आहेत.

मार्केट कमिटीत २८०० क्विंटल तुरीची आवक
मार्केट कमिटीत २८०० क्विंटल तुरीची आवक झाली आहे. सहाः स्थितीत हरभऱ्याचीदेखील मोठ्या प्रमाणावर आवक होत असून, प्रतिक्विंटल ५,५३० रुपयांचा दर मिळाला आहे.

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अक्कलकोट तालुक्यातील खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हमीभावापेक्षाही जास्तीचा दर मिळत असतानाही तुरीची आवक म्हणावी तशी नसल्याची खंत आहे. - गुरू हौशेट्टी, व्यापारी

दुधनी मार्केट कमिटीतील व्यापार प्रक्रिया शेतकरी हिताच्या दृष्टीने सुरू आहे. तुरीचे दर वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आलेल्या शेतमालाला योग्य भाव, वजन व तत्काळ रोख पट्टीची व्यवस्था केली जाते. - अप्पू परमशेट्टी, सभापती, मार्केट कमिटी

सद्यःस्थितीत दुधनी मार्केट कमिटीत तुरीला, सोयाबीनला विक्रमी भाव मिळत आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे उत्पन्नात घट झाली असल्याने आवक कमी होऊन दर वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी पाहता तुरीच्या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. - एस. एस. स्वामी, सचिव, दुधनी मार्केट कमिटी

अधिक वाचा: १२ लाख टन सोयाबीन खरेदीचं आव्हान; सरकारच्या 'या' निर्णयामुळे खुल्या बाजारातील सोयाबीन दरात वाढ

Web Title : तुअर दाल की कीमतें बढ़ीं, दुधनी में ₹9,000 का आंकड़ा पार

Web Summary : सरकारी पहलों के बाद दुधनी बाजार में तुअर की कीमतें ₹9,400/क्विंटल तक पहुंच गईं। अक्कलकोट के किसान खुश हैं क्योंकि कीमतें समर्थन मूल्य से अधिक हैं। बाजार में 2800 क्विंटल की आवक हुई, सोयाबीन को भी अच्छे दाम मिले।

Web Title : Tur Dal Prices Soar, Crossing ₹9,000 Mark in Dudhani

Web Summary : Tur prices in Dudhani market hit a high of ₹9,400/quintal after government initiatives. Farmers in Akkalkot are delighted as prices exceed the support price. 2800 quintals arrived in the market, with soybean also fetching good rates.