नवी मुंबई : जुन्या लसणाचा हंगाम शेवटच्या टप्प्यावर असून, बाजारभाव गतवर्षीपेक्षा निम्यावर आहेत. फेब्रुवारीपासून नवीन मालाची मोठ्या प्रमाणात आवक होईल.
आवक कशी होणार यावर नवीन हंगामातील लसणाचे दर अवलंबून राहणार आहेत. मुंबईबाजार समितीमध्ये जानेवारी २०२५ मध्ये लसणाचे दर १०० ते २१० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते.
किरकोळ मार्केटमध्ये लसूण ४०० ते ५०० रुपयांवर पोहोचला होता. फेब्रुवारीनंतर आवक वाढल्यावर दर नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली.
परराज्यातून मोठी आवक
◼️ प्रत्येक वर्षी डिसेंबरअखेर व जानेवारीची सुरुवात हा लसूण हंगामाचा शेवट असतो.
◼️ जानेवारी अखेरपासून नवीन आवक सुरू होत असते.
◼️ बाजार समितीमध्ये सर्वाधिक लसणाची आवक मध्यप्रदेश व राजस्थानमधून होते.
◼️ चायनाचा लसूणही विक्रीसाठी येत असतो.
◼️ सद्य:स्थितीमध्ये बाजार समितीमध्ये ४० ते ११० रुपये किलो दराने लसणाची विक्री होत आहे.
२०२५ मधील लसणाचे दर
महिना - दर
जानेवारी - १०० ते २१०
फेब्रुवारी - ३० ते ८०
मार्च - ४० ते ११०
एप्रिल - २० ते ८०
मे - ४० ते ११०
जून - ३० ते १००
जुलै - २० ते ८०
ऑगस्ट - २५ ते ७५
सप्टेंबर - ३० ते ८०
ऑक्टोबर - २५ ते ७५
नोव्हेंबर - २५ ते ७५
डिसेंबर - ५० ते ११०
किरकोळ बाजारात १०० ते २६० रुपये किलो भाव
◼️ किरकोळ मार्केटमध्ये हेच दर १०० ते २६० रुपयांपर्यंत आहेत.
◼️ उच्चभ्रू नागरिकांची वसाहत असलेल्या ठिकाणी बाजारभाव ३०० पर्यंतही आहेत.
◼️ गतवर्षी जानेवारीअखेरीला होलसेल मार्केटमध्ये लसणाचे दर १०० ते २१० रुपयांपर्यंत होते.
◼️ किरकोळ मार्केटमध्ये ४०० ते ५०० रुपयांपर्यंत दर गेले होते. यावर्षी त्या तुलनेने दर कमी आहेत.
◼️ नवीन मालाची आवक कथी होते यावर पुढील दर अवलंबून राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अधिक वाचा: शेतजमिनींच्या पोटहिश्श्यांच्या मालकी हक्काबाबतचे वाद आता मिटणार; सुरु होतोय 'हा' पथदर्शी प्रकल्प
