Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > एका महिन्यात कढीपत्त्याचा बाजारभाव झाला दुप्पट; वाचा आजमितीला काय मिळतोय दर?

एका महिन्यात कढीपत्त्याचा बाजारभाव झाला दुप्पट; वाचा आजमितीला काय मिळतोय दर?

The market price of curry leaves has doubled in a month; Read what is the price being offered? | एका महिन्यात कढीपत्त्याचा बाजारभाव झाला दुप्पट; वाचा आजमितीला काय मिळतोय दर?

एका महिन्यात कढीपत्त्याचा बाजारभाव झाला दुप्पट; वाचा आजमितीला काय मिळतोय दर?

kadipatta market खराब हवामानाचा फटका कढीपत्ता उत्पादनाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. यामुळे एक महिन्यात बाजारभाव दुप्पट झाले आहेत.

kadipatta market खराब हवामानाचा फटका कढीपत्ता उत्पादनाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. यामुळे एक महिन्यात बाजारभाव दुप्पट झाले आहेत.

खराब हवामानाचा फटका कढीपत्ता उत्पादनाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. यामुळे एक महिन्यात बाजारभाव दुप्पट झाले आहेत.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडचात दोन दिवस कढीपत्ताची आवक पूर्णपणे थांबली होती. होलसेल मार्केटमध्ये बाजारभाव २०० ते ४०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले होते.

असे वाढले भाव
◼️ बाजार समितीमध्ये जानेवारीमध्ये कढीपत्ता ५० ते ६० रुपये किलो दराने विकला जात होता.
◼️ २० ते २२ फेब्रुवारीला अचानक आवक बंद झाली व बाजारभावच २०० ते ४०० रुपये किलो झाले होते.
◼️ किरकोळ मार्केटमध्ये तो मिळेनासा झाला होता. आता पुन्हा आवक सुरू झाली असून, बाजारभाव २५ ते १०५ रुपये किलोवर गेला आहे.

जानेवारी - ५० ते ६० रु.
फेब्रुवारी - २०० ते ४०० रु.
मार्च - ९५ ते १०५ रु.

कढीपत्त्याशिवाय भाजी बेचव
रोजच्या आहारातील सर्व भाज्या, नाष्ट्यातील पोहे, इडलीसांबर व इतर मांसाहार सर्वांची चव वाढावी, यासाठी कढीपत्त्याचा वापर केला जातो; परंतु, फेब्रुवारीअखेरीस कढीपत्ता गायब झाल्यामुळे अनेकांचे जेवण बेचव झाले होते.

दक्षिणेत सर्वाधिक उत्पादन
◼️ कढीपत्त्याचे सर्वाधिक उत्पादन आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा व कर्नाटक या चार राज्यांमध्ये होत असते.
◼️ यावर्षी खराब हवामानाचा फटका कढीपत्ता पानांच्या उत्पादनावर झाला आहे. यामुळे मुंबईत अपेक्षित आवक होत नाही.

मुंबईत प्रतिदिन १५ ते २० टन मागणी
◼️ मुंबई, नवी मुंबई परिसरात कढीपत्त्याला वर्षभर मागणी असते. बाजार समितीमध्ये रोज १५ ते २० टन कढीपत्त्याची विक्री होत असते.
◼️ यापूर्वी कढीपत्ता खूपच स्वस्त असल्यामुळे अनेक भाजीविक्रेते भाजीसोबत कढीपत्त्याची काही पाने मोफतही देत असत किंवा १० रुपयांना एक काडी दिली जात होती.

अधिक वाचा: मनाप्रमाणे जास्त क्षमतेचा सोलार प्रकल्प बसविण्याचा मार्ग झाला बंद; आता 'हा' नवा नियम लागू

Web Title: The market price of curry leaves has doubled in a month; Read what is the price being offered?