Lokmat Agro >बाजारहाट > राज्यातील सर्वात मोठा फुलबाजार; दररोज सुमारे ३० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल

राज्यातील सर्वात मोठा फुलबाजार; दररोज सुमारे ३० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल

The largest flower market in the state; Daily turnover of about Rs 30 crore | राज्यातील सर्वात मोठा फुलबाजार; दररोज सुमारे ३० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल

राज्यातील सर्वात मोठा फुलबाजार; दररोज सुमारे ३० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल

Flower Market गणपतीचे दहा दिवस, दसरा आणि दिवाळीत दादरचे फूल मार्केट गर्दीने ओसंडून वाहते. या काळात संपूर्ण मुंबई शहराबरोबरच महामुंबईतले भक्तगणही फुला-पानांच्या खरेदीसाठी या बाजारात येतात.

Flower Market गणपतीचे दहा दिवस, दसरा आणि दिवाळीत दादरचे फूल मार्केट गर्दीने ओसंडून वाहते. या काळात संपूर्ण मुंबई शहराबरोबरच महामुंबईतले भक्तगणही फुला-पानांच्या खरेदीसाठी या बाजारात येतात.

शेअर :

Join us
Join usNext

गणपतीचे दहा दिवस, दसरा आणि दिवाळीत दादरचे फूल मार्केट गर्दीने ओसंडून वाहते. या काळात संपूर्ण मुंबई शहराबरोबरच महामुंबईतले भक्तगणही फुला-पानांच्या खरेदीसाठी या बाजारात येतात.

गणेशोत्सवात जास्वंदी, दुर्वा आणि शेवंतीला अधिक मागणी असतेच, अबोली आणि मोगरा हेही भाव खाऊन जातात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांचा भाव वधारतो, तर दिवाळीला सर्वच फुलांची मागणी वाढते.

Dadar Flower Market उत्सवी वातावरणात या फूल मार्केटमध्ये दररोज सुमारे ३० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. व ऑफ सिझनला १० ते १५ कोटी रुपये उलाढाल होते.

दादर फुल मार्केटविषयी थोडक्यात
◼️ दादरच्या माँ साहेब मीनाताई ठाकरे मंडईतील दुकाने ६००.
◼️ मंडईच्या आसपास सुमारे ३०० फूलविक्रेते.
◼️ फ्लायओव्हर लगत फुलांची टोपली घेऊन बसणारे सुमारे ४०० विक्रेते.
◼️ दादर ओल्ड मार्केट म्हणजे फ्लायओव्हर खाली आणि लगत फुलांची सुमारे ३० दुकाने.
◼️ कर्जत, कसाऱ्यासह अन्य ठिकाणांहूनही फूलविक्रेते येतात.
◼️ पहाटेपासून बाजार गजबजतो, रात्री उशिरापर्यंत चालू राहतो.
◼️ उत्सवकाळात राज्यातून रोज ४०० ट्रक तर २०० टेम्पो फुलांची आवक होते. ऑफ सिझनला हा आकडा निम्म्यावर येतो.
◼️ बंगळुरूमधून अबोली आणि मोगरा विमानाने दाखल होतो. शिवाय वसई-विरार, पालघरमधूनही अबोली, मोगरा येतो.

रोजची उलाढाल किती?
◼️ सिझन - २५ ते ३० कोटी रुपये
◼️ ऑफ सिझन - १० ते १५ कोटी रुपये

फुलांचा तोरा
◼️ अबोली : १२०० ते १५०० रुपये किलो
◼️ मोगरा : २५०० ते ३ हजार रुपये किलो
◼️ शेवंती : ४०० रुपये प्रतिकिलो
◼️ लाल गुलाब : १५० ते २५० रुपये
◼️ इतर रंगांचे गुलाब : १५० ते ३०० रुपये

सचिन लुंगसे
उपमुख्य उपसंपादक

अधिक वाचा: 'आयटी'तील नोकरी सोडून हिंगणगावचा रणजीत रमला ७० एकर शेतीत; वाचा सविस्तर

Web Title: The largest flower market in the state; Daily turnover of about Rs 30 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.