Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > सांगली बाजार समितीत चिक्की गुळास पाच हजार १०० रुपये इतका उच्चांकी भाव

सांगली बाजार समितीत चिक्की गुळास पाच हजार १०० रुपये इतका उच्चांकी भाव

The highest price of Chikki jaggery in Sangli market Committee is 5 thousand 100 rupees | सांगली बाजार समितीत चिक्की गुळास पाच हजार १०० रुपये इतका उच्चांकी भाव

सांगली बाजार समितीत चिक्की गुळास पाच हजार १०० रुपये इतका उच्चांकी भाव

उसाचा हंगाम सुरू झाल्याने गुळाची आवक वाढली आहे. बाजारात सरासरी क्विंटलला तीन हजार ८०० ते चार हजार ५०० रुपयांपर्यंत भाव आहे.

उसाचा हंगाम सुरू झाल्याने गुळाची आवक वाढली आहे. बाजारात सरासरी क्विंटलला तीन हजार ८०० ते चार हजार ५०० रुपयांपर्यंत भाव आहे.

सांगलीबाजार समिती आवारात सोमवारी काढलेल्या गूळ सौद्यात चिक्की गुळास पाच हजार १०० रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला. उसाचा हंगाम सुरू झाल्याने गुळाची आवक वाढली आहे. बाजारात सरासरी क्विंटलला तीन हजार ८०० ते चार हजार ५०० रुपयांपर्यंत भाव आहे.

मार्केट यार्डातील आडत दुकानदार व चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई यांच्या पंचलिंगेश्वर या दुकानातील गूळ सौद्यामध्ये शेतकरी सुरेश मारुती पुणेकर (रा. निडगुंदी जि. बेळगाव) यांच्या अर्धा किलो पॅकिंगमधील चिक्की गुळास पाच हजार १०० रुपये उच्चांकी दर मिळाला. गुळ भेलीस व गूळ रवेस क्विंटलला कमीत कमी तीन हजार ८०० पासून चार हजार ५०० पर्यंत दर मिळत आहे. यावेळी बाजार समितीचे संचालक कडप्पा वारद, सूर्यकांत आडके, दर्याप्पा बिळगे उपस्थित होते.

गूळ विक्रीसाठी आणावा
गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी सांगली बाजार समितीत गुळ विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे व सचिव महेश चव्हाण यांनी केले आहे.

Web Title: The highest price of Chikki jaggery in Sangli market Committee is 5 thousand 100 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.