Lokmat Agro >बाजारहाट > पुणे मार्केट यार्डातील फळबाजारात आंब्याची आवक वाढली; कोकण हापूसला कसा मिळतोय दर?

पुणे मार्केट यार्डातील फळबाजारात आंब्याची आवक वाढली; कोकण हापूसला कसा मिळतोय दर?

The arrival of mangoes has increased in the fruit market in Pune Market Yard; How are Konkan Hapus getting the best price? | पुणे मार्केट यार्डातील फळबाजारात आंब्याची आवक वाढली; कोकण हापूसला कसा मिळतोय दर?

पुणे मार्केट यार्डातील फळबाजारात आंब्याची आवक वाढली; कोकण हापूसला कसा मिळतोय दर?

Hapus Mango Market Pune कोकणातील हापूस आंब्यांचा हंगाम बहरला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात हापूसची आवक वाढली आहे. हापूसची आवक वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरातही घट झाली आहे.

Hapus Mango Market Pune कोकणातील हापूस आंब्यांचा हंगाम बहरला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात हापूसची आवक वाढली आहे. हापूसची आवक वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरातही घट झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे: कोकणातील हापूस आंब्यांचा हंगाम बहरला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात हापूसची आवक वाढली आहे. हापूसची आवक वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरातही घट झाली आहे.

येत्या काही दिवसांत हापूसची आवक वाढणार असून, दरात आणखी घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हवामान बदलामुळे यंदा हापूसच्या लागवडीत घट झाली आहे.

नेहमीच्या तुलनेत हापूसचे उत्पादन केवळ ६० टक्के झाले असून, हंगाम उशिराने सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात कोकणातून तीन ते चार हजार पेट्यांची आवक झाली होती. कोकणातून सहा ते साडेसहा हजार पेट्यांची आवक झाली आहे.

आवक वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे. चार ते आठ डझनाच्या पेटीला प्रतवारीनुसार १५०० ते ४५०० रुपये दर मिळाले आहेत.

एक डझन तयार हापूसला प्रतवारीनुसार ४०० ते ८०० रुपये दर मिळाला आहे. हापूसची आवक वाढली असून, दरात घट होत आहे. यंदा हंगाम लवकर संपणार आहे, असे व्यापारी युवराज काची म्हणाले.

कर्नाटकातून आवक वाढली
-
कर्नाटकातील आंब्यांची आवक वाढली आहे.
- यंदा वातावरणातील बदलामुळे कर्नाटकातील तुमकूर भागातील आंब्याला कमी प्रमाणावर मोहर लागला.
- रविवारी बाजारात कर्नाटकातील दोन डझन आंब्यांच्या दहा हजार पेट्यांची आवक झाली.
- लाकडी पेट्यांची आवक कमी झाली.
- २० एप्रिलनंतर आवक वाढणार आहे.
- सध्या तीन ते चार डझन कच्च्या आंब्याच्या पेटीला प्रतवारीनुसार १२०० ते १८०० रुपये दर मिळाला आहे.
- १ किलो पायरीला १२० ते १५० रुपये दर आहे. ग्राहकांची आंब्याला मागणी वाढत आहे.
अशी माहिती कर्नाटकचे व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली.

हापूसची आवक वाढली असून, बाजारात कोकणातून सहा ते साडेसहा हजार पेट्यांची आवक होत आहे. मंगळवारची आवक ही हंगाम सुरू झाल्यानंतर हापूसची उच्चांकी आवक होत आहे. - बाळासाहेब कोंडे, विभागप्रमुख, फळबाजार, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

यंदा सुरुवातीला आंबा महाग होता. पाडव्याच्या दिवशी आंबा सर्वाधिक महाग होता. त्या दिवशी खरेदी करण्यासाठी गेली असता १२०० ते १५०० रुपये डझन भाव होता. आता आंब्याचा भाव कमी झाला असून, ४०० ते ८०० रुपये डझनने मिळत आहे. स्वस्त झाल्याने आंबा खरेदी आता परवडत आहे. - पूजा मोहिते, गृहिणी 

अधिक वाचा: कोथिंबीर, मेथी शेतकऱ्यांना करणार लखपती; मंचर बाजार समितीत मिळाला विक्रमी दर

Web Title: The arrival of mangoes has increased in the fruit market in Pune Market Yard; How are Konkan Hapus getting the best price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.