Join us

आषाढी एकादशी निमित्ताने रताळ्याची आवक सुरू; कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 10:16 IST

ratale bajar bhav आषाढी एकादशीनिमित्त सर्वसामान्यांकडून उपवासासाठी रताळ्यांची मागणी जास्त असते. आषाढी एकादशी रविवारी (दि. ६) आहे. या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डात रताळ्याची आवक सुरू झाली आहे.

पुणे : आषाढी एकादशीनिमित्त सर्वसामान्यांकडून उपवासासाठी रताळ्यांची मागणी जास्त असते. आषाढी एकादशी रविवारी (दि. ६) आहे. या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डात रताळ्याची आवक सुरू झाली आहे.

मात्र यंदा अवकाळी पावसामुळे उत्पादन कमी झाले असून जागेवर माल खरेदी करणे आणि पावसामुळे यंदा रताळ्याची आवक एक हजार ते दीड हजार पोत्यांनी घटली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आवक साधारण आहेच, तरी दर मात्र स्थिर आहेत. यंदा मात्र ५० ते ६० रुपये भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात १०० रुपये किलो भावाने विक्री होत आहे.

गावरान रताळ्याची २५०० ते २७०० पोती आवक- पावसामुळे यंदा एक ते दीड हजार आवकच घटल्याने साधारण यंदा २५०० ते २७०० पोती आवक मार्केट यार्ड येथे होत आहे.- सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंदरगाव, मांजरगाव येथून आवक होत आहे.- मागील वर्षी येथील बाजारात ८ ते १० हजार पोती आवक झाली होती. त्यामध्ये घट होऊन २५०० ते २७०० पोती आवक होत आहे.- त्यात कर्नाटकातूनही आवक सुरू असल्याने सध्या रताळ्याचे भाव स्थिर आहेत.

चवीला गोड- सोलापूर, करमाळा, कराड, सातारा, कोल्हापूर या भागातून गावरान रताळ्याची आवक होत आहे.- ही रताळे आकाराने लहान व चवीला गोड व स्वादिष्ट आहेत.- तर कर्नाटक रताळे आकाराने मोठी व चवीला साधारण कमी गोड असतात.

गावरान रताळ्याची मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आवक कमी असली, तरी भाव चांगला मिळाला आहे. गुरुवारी मार्केट यार्ड बाजारात २०० पोती रताळे आली आहेत. पूर्वर्वीपेक्षा यंदा एकरी केवळ ७० ते ८० पोती उत्पादन मिळत आहे. - उमेश कांबळे, शेतकरी, करमाळा

आषाढी एकादशीच्या उपवासासाठी रताळ्याची आवक सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि कर्नाटक येथून आवक होत आहे. रताळं चवीला गोड असून नागरिकांकडून मोठी मागणी सुरू आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आवक कमी असली तरी भाव मात्र स्थिर आहेत. - अमोल घुले, आडतदार, मार्केट यार्ड

अधिक वाचा: मागील दोन वर्षातील पिक नुकसान भरपाईचे पैसे आले; लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार

टॅग्स :बाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपुणेबटाटाशेतकरीसोलापूरआषाढी एकादशी २०२५