Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > सोयाबीनचे दर हमीभावाचा टप्पा ओलांडणार; सांगली बाजारात सोयाबीनच्या दरात मोठी वाढ

सोयाबीनचे दर हमीभावाचा टप्पा ओलांडणार; सांगली बाजारात सोयाबीनच्या दरात मोठी वाढ

Soybean prices will cross the msp price mark; Soybean prices increase significantly in Sangli market | सोयाबीनचे दर हमीभावाचा टप्पा ओलांडणार; सांगली बाजारात सोयाबीनच्या दरात मोठी वाढ

सोयाबीनचे दर हमीभावाचा टप्पा ओलांडणार; सांगली बाजारात सोयाबीनच्या दरात मोठी वाढ

soybean bajar bhav यावर्षी सोयाबीनचे उत्पादनही जिल्ह्यात घटले आहे. याचाच परिणाम म्हणून की काय सध्या सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक कमी होत असताना मागणी वाढत आहे.

soybean bajar bhav यावर्षी सोयाबीनचे उत्पादनही जिल्ह्यात घटले आहे. याचाच परिणाम म्हणून की काय सध्या सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक कमी होत असताना मागणी वाढत आहे.

सांगली : राष्ट्रीय स्तरावर सोयाबीनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दरावर दिसून येत अवघ्या दोन दिवसांत चांगल्या दर्जाच्या सोयाबीनचे दर एक हजाराने वाढले आहेत

त्यामुळे सोयाबीनचे दर हमीभावाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता बाजार तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सांगली मार्केट यार्डात सोमवारी निघालेल्या सौद्यामध्ये प्रतिक्विंटल चार हजार ५०० रुपये दर मिळाला आहे.

सोयाबीनचा २०२५-२६ या आर्थिक वर्षात हमीभाव प्रतिक्विंटल पाच हजार ३२८ रुपये आहे. हमीभावापर्यंतही सोयाबीनला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराज होता.

यावर्षी सोयाबीनचे उत्पादनही जिल्ह्यात घटले आहे. याचाच परिणाम म्हणून की काय सध्या सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक कमी होत असताना मागणी वाढत आहे.

उच्च प्रतिचे म्हणजे बियाणासाठी वापरण्यात येणाऱ्या सोयाबीनचे दर दोनच दिवसांत दीड हजारांनी वाढले असून, मिल क्वॉलिटी सोयाबीनही साडेचार हजारांपर्यंत पोहोचले आहेत.

सांगली बाजार समितीत दोन दिवसांपूर्वी सोयाबीनला चार हजार २५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा दर मिळाला होता, तर याच बाजार समितीत सोमवारी सोयाबीनला चार हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा दर मिळाला.

तथापि, दराचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करावी, असा सल्लाही त्यांच्याकडून दिला जात आहे.

सोयाबीनच्या दरात तेजीची कारणे
◼️ सद्यःस्थितीत सोयाबीन तेलाची मागणी वाढली आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगांकडून खरेदीत वाढ करण्यात आली आहे.
◼️ दुसरीकडे यंदा खरिपात सोयाबीनचा पेरा कमी झाला आहे.
◼️ त्यातच नाफेडची सोयाबीन खरेदी आता सुरू झाली आहे. त्यामुळे दराला आधार मिळत आहे.

अधिक वाचा: सोलापूर जिल्ह्यातील 'या' १९ कारखान्यांचे ऊस दर जाहीर; कोणत्या कारखान्याने दिला सर्वाधिक दर?

Web Title : सोयाबीन की कीमतें गारंटीकृत दर को पार करेंगी; सांगली में बड़ी वृद्धि

Web Summary : सांगली में सोयाबीन की कीमतें बढ़ी मांग और कम उत्पादन के कारण बढ़ रही हैं। दो दिनों में कीमतें ₹1,000 बढ़ीं, जो ₹5,328/क्विंटल की गारंटीकृत दर के करीब है। तेल की बढ़ती मांग और नाफेड की खरीद से तेजी आ रही है। किसानों को बेचने से पहले दरों की निगरानी करने की सलाह दी जाती है।

Web Title : Soybean Prices to Surpass Guaranteed Rate; Significant Rise in Sangli

Web Summary : Soybean prices in Sangli are rising due to increased demand and reduced production. Prices surged by ₹1,000 in two days, nearing the guaranteed rate of ₹5,328/quintal. Increased oil demand and NAFED's purchase are driving the surge. Farmers advised to monitor rates before selling.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.