Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > साडेआठ हजारांहून वर गेलेल्या सोयाबीनच्या दरात मोठी घसरण; शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण

साडेआठ हजारांहून वर गेलेल्या सोयाबीनच्या दरात मोठी घसरण; शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण

Soybean prices, which have gone above 8,500, have fallen sharply; There is an atmosphere of disappointment among farmers | साडेआठ हजारांहून वर गेलेल्या सोयाबीनच्या दरात मोठी घसरण; शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण

साडेआठ हजारांहून वर गेलेल्या सोयाबीनच्या दरात मोठी घसरण; शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण

Soybean Market Update : बाजार समित्यांमध्ये बिजवाई सोयाबीनचे दर साडेआठ हजार रुपये प्रती क्विंटलच्यावर पोहोचले होते; मात्र मागील काही दिवसांपासून या सोयाबीनच्या दरात सतत घसरण होत आहे. शनिवारी सोयाबीनला केवळ 'रुपये' प्रती क्विंटलपर्यंतचेच दर मिळाले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे.

Soybean Market Update : बाजार समित्यांमध्ये बिजवाई सोयाबीनचे दर साडेआठ हजार रुपये प्रती क्विंटलच्यावर पोहोचले होते; मात्र मागील काही दिवसांपासून या सोयाबीनच्या दरात सतत घसरण होत आहे. शनिवारी सोयाबीनला केवळ 'रुपये' प्रती क्विंटलपर्यंतचेच दर मिळाले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे.

वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये बिजवाई सोयाबीनचे दर साडेआठ हजार रुपये प्रती क्विंटलच्यावर पोहोचले होते; मात्र मागील काही दिवसांपासून या सोयाबीनच्या दरात सतत घसरण होत आहे. शनिवारी वाशिमबाजार समितीत या सोयाबीनला केवळ ५ हजार ८०० रुपये प्रती क्विंटलपर्यंतचेच दर मिळाले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे.

जिल्ह्यातील वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत मागील दोन महिन्यांपासून बिजवाई दर्जाच्या सोयाबीनची आवक होत आहे. या बाजार समितीत बिजवाई दर्जाच्या उन्नती ११३५ या सोयाबीन वाणाचे दर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ८ हजार ५०० रुपये प्रती क्विंटलच्याही वर पोहोचले होते.

वाशिम बाजार समितीत बिजवाई सोयाबीन मिळणाऱ्या विक्रमी दराची माहिती राज्यातील अनेक जिल्ह्यात पसरली होती. त्यामुळे हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यातील शेतकरी वाशिमच्या बाजार समितीत सोयाबीनच्या विक्रीसाठी धाव घेत होते.

त्यामुळे या बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक होऊ लागली होती. मागील काही दिवसांपासून मात्र बिजवाई सोयाबीनच्या दरात सतत घसरण होत असून, या दर्जाच्या सोयाबीनचे दर आता थेट ६ हजार रुपये प्रती क्विंटलच्या खाली घसरले आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात निराशेचे वातावरण पसरले आहे.

असे घसरले बीजवाई सोयाबीनचे दर!

०७ नोव्हेंबर - ८५३०
१४ नोव्हेंबर - ८१२०
२० नोव्हेंबर - ६००० 
२७ डिसेंबर - ६१४५
६ डिसेंबर - ७०३०
१३ डिसेंबर - ५८००

शनिवारी दहा हजार क्विंटल आवक

• वाशिम येथील बाजार समितीत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनची आवक ३० हजार क्विंटलवर पोहोचली होती. त्यावेळी सोयाबीनला आकर्षक दरही मिळत होते; मात्र दरात घसरण सुरू होताच शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री थांबवली.

• आता रब्बी हंगामाच्या खर्चासाठी शेतकरी सोयाबीन विकत आहेत. त्यामुळे पुन्हा आवक वाढत असून, शनिवारी या बाजार समितीत १० हजार २०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.

हेही वाचा : आता सर्पदंशावर होणार अचूक उपचार; स्नेक वेनम किटमुळे कळणार सर्पदंश विषारी की बिनविषारी

Web Title : वाशिम में सोयाबीन की कीमतों में गिरावट, किसानों में निराशा का माहौल

Web Summary : वाशिम बाजारों में सोयाबीन की कीमतें ₹8,500 से गिरकर ₹5,800 प्रति क्विंटल हो गई हैं, जिससे किसानों में निराशा है। शुरुआती ऊंची कीमतों ने पड़ोसी जिलों के किसानों को आकर्षित किया, लेकिन लगातार गिरावट से निराशा हुई क्योंकि रबी सीजन का खर्च बढ़ रहा है।

Web Title : Soybean Prices Plummet in Washim, Farmers Face Disappointment Amidst Price Drop

Web Summary : Soybean prices in Washim markets have fallen sharply from ₹8,500 to ₹5,800 per quintal, causing distress among farmers. Despite high initial prices attracting farmers from neighboring districts, the continuous decline has led to disappointment as rabi season expenses loom.