Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Jowar Price Today: ज्वारीच्या दराने गाठला आजपर्यंतचा उच्चांक; वाचा मालदांडी व शाळू ज्वारीला काय मिळतोय दर?

Jowar Price Today: ज्वारीच्या दराने गाठला आजपर्यंतचा उच्चांक; वाचा मालदांडी व शाळू ज्वारीला काय मिळतोय दर?

Sorghum prices hit all-time high; Read: What is the price being paid for Maldandi and Shalu sorghum? | Jowar Price Today: ज्वारीच्या दराने गाठला आजपर्यंतचा उच्चांक; वाचा मालदांडी व शाळू ज्वारीला काय मिळतोय दर?

Jowar Price Today: ज्वारीच्या दराने गाठला आजपर्यंतचा उच्चांक; वाचा मालदांडी व शाळू ज्वारीला काय मिळतोय दर?

Jwari Price Today: बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या भुसार मालाची मोठ्या प्रमाणात आवक होत असून सोमवारी ज्वारीची तब्बल १५ हजार कट्टयांची विक्रमी नोंद झाली.

Jwari Price Today: बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या भुसार मालाची मोठ्या प्रमाणात आवक होत असून सोमवारी ज्वारीची तब्बल १५ हजार कट्टयांची विक्रमी नोंद झाली.

बार्शी : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या भुसार मालाची मोठ्या प्रमाणात आवक होत असून सोमवारी ज्वारीची तब्बल १५ हजार कट्टयांची विक्रमी नोंद झाली. ज्वारीला प्रतिक्विंटल २५०० ते ५१०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

बाजार समितीचे चेअरमन विजय गरड यांनी सांगितले की, सध्या बाजारात ज्वारीसोबतच चिंच, हरभरा, तूर आणि सोयाबीनचीही मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे.

यंदा उत्पादन चांगले झाल्यामुळे शेतकरी योग्य भावाच्या प्रतीक्षेत माल बाजारात आणत आहेत. सोमवारी झालेल्या व्यवहारात ज्वारीच्या गुणवत्तेनुसार २५००, ३८०० ते ५१०० रुपये दर मिळाला.

कडब्याची दररोज ४१ वाहने विक्रीला
कडब्याची दररोज ४१ वाहने विक्रीसाठी येत असून, त्याला ६००, १००० ते ११८० रुपये दर मिळत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव तुकाराम जगदाळे यांनी दिली.

कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कालचे व आजचे ज्वारीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/03/2026
मुंबईलोकलक्विंटल1233260065005150
पुणेमालदांडीक्विंटल681520062005700
पैठणरब्बीक्विंटल1250125012501
25/03/2026
सोलापूरमालदांडीक्विंटल71381045514200
पुणेमालदांडीक्विंटल683540062005800
बीडमालदांडीक्विंटल233215033852911
परांडामालदांडीक्विंटल1410041004100
जालनाशाळूक्विंटल2238240047003700
सांगलीशाळूक्विंटल165480060005400
परतूरशाळूक्विंटल16230036333300
देउळगाव राजाशाळूक्विंटल25230033003150
गंगापूरशाळूक्विंटल62390044004151

अधिक वाचा: रॉकेल वाटपाचा जीआर आला; आता एका रेशन कार्डवर नक्की किती रॉकेल मिळणार? वाचा सविस्तर

Web Title : ज्वार की कीमतें रिकॉर्ड ऊंचाई पर; मालदांडी और शालू की दरों का विवरण।

Web Summary : बार्शी में ज्वार की कीमतें आसमान छू रही हैं, ₹5100/क्विंटल तक पहुंचीं। उच्च उपज और किसानों की प्रत्याशा बाजार गतिविधि को बढ़ा रही है। पुणे में मालदांडी ज्वार ₹6200/क्विंटल में बिकी। जालना में शालू किस्म का कारोबार ₹3700/क्विंटल के आसपास है। चारे की आपूर्ति में भी वृद्धि दर्ज की गई।

Web Title : Sorghum Prices Reach Record High; Maldaandi and Shalu Rates Detailed.

Web Summary : Sorghum prices are soaring, reaching ₹5100/quintal in Barshi. High yields and farmer anticipation drive market activity. Maldaandi sorghum fetches ₹6200/quintal in Pune. Shalu variety trades around ₹3700/quintal in Jalna. Increased supply of fodder also noted.