सोलापूर : श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात चढ-उतार सुरूच आहे. सोमवारी दरात ३०० रुपयांनी वाढ झाली होती.
मंगळवारी त्यात पुन्हा ४०० रुपयाने घट झाली. प्रतिक्विंटल ३२०० रुपयांवरून २८०० रुपयांपर्यंत दर खाली आला आहे.
मंगळवारी ५०५ ट्रक कांद्याची आवक होती. सरासरी दर १३०० रुपयांवरून ११०० रुपयांपर्यंत घसरल्याचे दिसून आले.
जानेवारी महिन्यात कांद्याची मोठी आवक राहणार आहे. एका दिवसात ५ कोटी ५६ लाख रुपयाची उलाढाल झाली.
अधिक वाचा: देशपातळीवर सर्वोत्कृष्ट ठरलेला 'हा' साखर कारखाना राज्यातही ठरला सर्वोत्तम
