Join us

सोलापूर बाजार समितीत १२ हजार क्रेट डाळिंबाची आवक; किलोला कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 11:02 IST

Dalimb Bajar Bhav कांदा, बेदाणे मार्केट विक्रीमध्ये अनेक विक्रम करणाऱ्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ११ ते १२ हजार क्रेटची आवक होत आहे.

सोलापूर : कांदा, बेदाणे मार्केट विक्रीमध्ये अनेक विक्रम करणाऱ्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ११ ते १२ हजार क्रेटची आवक होत आहे.

किमान २० ते कमाल ३०० रुपये भाव मिळत असल्याने आवकमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीपराव माने यांच्या नेतृत्वाखाली बाजार समिती नवनवीन उच्चांक करीत आहेत.

कांदा विक्रीसाठी व बेदाणे मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, तर डाळिंब क्रेटऐवजी किलोवर विक्रीचा निर्णय घेतला असल्याने बाजार समितीमध्ये डाळिंबाची आवक देखील वाढली आहे.

दररोज ११ हजार ते १२ हजार क्रेट डाळिंब विक्रीसाठी येत आहे. गुणप्रतीनुसार २० रुपयांपासून ३०० रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने व वजन-काटे व बिलांच्या विश्वासार्हतेमुळे आवक वाढली आहे.

श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाची दिवसेंदिवस आवक वाढत असून त्यांच्या मालाचे योग्य वजन, विक्रीनंतर बिलाची रक्कम व आवश्यक सोयीसुविधा याकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहे. डाळिंब उत्पादकांच्या विश्वासामुळे लांबून मालाची आवक होत आहे. - दिलीपराव माने, सभापती

अधिक वाचा: Jamin Mojani : शेतजमीन मोजणी जलद होण्यासाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय: वाचा सविस्तर

टॅग्स :डाळिंबबाजारमार्केट यार्डसोलापूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीफळेकांदा