Join us

Solapur Kanda Market : सोलापुरात १७५ ट्रक कांद्याची आवक; उन्हाळी कांद्याला कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 15:35 IST

Kanda Bajar Bhav : कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी १७५ ट्रक कांद्याची आवक होती.

सोलापूर : कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी १७५ ट्रक कांद्याची आवक होती.

दर कमी झाल्याने मागील काही दिवसांपासून आवक घटली आहे. आंध्र व तेलंगणामध्ये कांद्याचे उत्पादन वाढल्यामुळे मागणी घटली आहे.

त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील उन्हाळी कांद्याला दर मिळालेला नाही. मागील पंधरा दिवसापूर्वी जवळपास २५० ट्रक कांद्याची आवक होत होती.

मात्र दरात घसरण झाल्याने आवकही घटली आहे. सध्या कमाल दर २००० रुपयांपर्यंत आहे. सरासरी दर १२०० रुपये प्रतिक्विंटल आहे. १ एप्रिलपासून दर वाढण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा: अल्पमुदत पीक कर्जावरील व्याज सवलतीसाठी १६५ कोटीचा निधी आला; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर

टॅग्स :कांदाबाजारशेतकरीसोलापूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डशेतीतेलंगणाआंध्र प्रदेश