संजय लव्हाडे
सणासुदीचे दिवस असल्याने सध्या बाजारात गिऱ्हाईकी चांगली असून, सरकी ढेप व नारळाच्या भावाने उच्चांक गाठला आहे. त्याचबरोबर खाद्यतेलातही तेजी आली आहे. सोन्या-चांदीने मंदीतून पुन्हा तेजीकडे वाटचाल केली आहे.
यावर्षीचा कापूस पुढील महिन्यात येणार आहे. सध्या सरकीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे कापसाच्या दरातही वाढ झाली आहे. सरकी ढेप हे मुख्यतः दुग्धजनावरांसाठी महत्त्वाचे पशुखाद्य आहे. सरकी ढेपने उच्चांक गाठला आहे. भाव ४ हजार ५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीस जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सरकी व सरकी ढेपचे भाव कमी असल्याने साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून याचा साठा करण्यात आला नाही. त्यावेळी साधारण भाव २ हजार ६०० ते २ हजार ८०० प्रति क्विंटल होता.
सोने-चांदीमध्ये पुन्हा तेजी
मागील काही महिन्यांपासून सोन्या-चांदीमध्ये सातत्याने तेजी पहावयास मिळत आहे. त्यातच मागील दोन आठवड्यांमध्ये यामध्ये मंदी दिसून आली. गत आठवड्यापासून पुन्हा सोने-चांदीमध्ये मोठी तेजी दिसून आली आहे. सोने १ लाख १ हजार प्रति तोळा, चांदी १ लाख १६ हजार रुपये प्रति किलोवर जाऊन पोहचली आहे.
जालना बाजारपेठेतील शेतमाल बाजारभाव
गहू - २५७५ ते ५००० प्रति क्विंटल
ज्वारी - २०००ते ३३०० प्रति क्विंटल
बाजरी - २१०० ते २५०० प्रति क्विंटल
मका - २००० ते २०५० प्रति क्विंटल
तूर - ६५५० प्रति क्विंटल
सोयाबीन - ३५०० ते ४६०० प्रति क्विंटल