गेल्या काही महिन्यात तांदळाचे दर मोठ्या प्रकाणावर वाढले आहेत. तांदळाचे दर सातत्याने वाढत असताना उत्पादित होणाऱ्या भाताला मात्र अत्यल्प दर मिळत आहे.
तुकडा तांदूळ ४० ते ४५ रूपये तर बारीक कोलम तांदूळ ८० तर बासमती तांदूळ १२० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. तर भाताला २३.७९ रूपये हमीभाव देण्यात येत आहे.
पाऊस गतवर्षी हंगामापूर्वी झाल्यामुळे पेरण्या उशिरा झाल्या तसेच अतिवृष्टीमुळे परिणाम झाल्यामुळे उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
भाताला २३७९ हमीभाव◼️ भाताला शासनाकडून क्विंटलला २३७९ रूपये दर देण्यात येत आहे.◼️ गतवर्षी २३०० रूपये दर होता, यावर्षी दरात अवघ्या ७९ रूपयांची वाढ झाली आहे.
दरात सातत्याने वाढ◼️ गेल्या काही दिवसात तांदळाच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे.◼️ तुकडा तांदळासाठी ४० ते ४५ रूपये मोजावे लागत आहेत. दरवाढीमुळे ग्राहकांला भुर्दंड बसत आहे.
८० रूपयांच्यावर दर◼️ बाजारात ८० रूपयांच्यावर तांदळाचे दर आहेत, मात्र असे असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भाताला प्रत्यक्ष कमी दर मिळत आहे.◼️ अतिवृष्टीमुळे भाताचे उत्पादन धोक्यात गतवर्षी मान्सूनपूर्व झालेला पाऊस व भात लागवडीच्यावेळी अतिवृष्टी यामुळे भाताचे उत्पादन धोक्यात आले असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
दरात तेजी राहणारउत्पादन कमी असल्यामुळे तांदळाच्या दरात तेजी राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
विक्रीसाठी अल्प प्रतिसाद◼️ दरवर्षी शेतकरी कुटूंबियांना लागणारा भात ठेवून उर्वरित भाताची विक्री करतात.◼️ गतवर्षी शेतकऱ्यांनी ४० हजार ८५९.३७ क्विंटल भाताची विक्री केली होती.◼️ मात्र यावर्षी विक्रीसाठी अत्यल्प प्रतिसाद मिळत असून ११०५ क्विंटल भाताची विक्री केली आहे.
पुन्हा साठेबाजांचे फावणार?◼️ मागणी वाढली परंतु उपलब्धता कमी असेल तर दरात वाढ होण्याची शक्यता आहे.◼️ अशावेळी विक्रेते मालाची साठेबाजी करून दरात वाढ करतात. यावर्षी भाताचे उत्पादन कमी असल्याने दरवाढीची शक्यता नाकारता येत नाही.
गतवर्षी अतिवृष्टीमुळे भात पिकाचे झालेले नुकसान यामुळे उत्पादकता धोक्यात आली आहे. परिणामी भात विक्रीसाठी शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे. बाजारात तांदळाची उत्पादकता कमी असल्यामुळे दरवाढीची शक्यता नाकारता येत नाही. - केशव भोगले, शेतकरी
अधिक वाचा: आता दस्त नोंदणीला येणार वेग; राज्यात लवकरच नवीन ६० खासगी दस्तनोंदणी कार्यालये सुरू होणार