पिंपरी : मोशी येथील श्री नागेश्वर महाराज उपबाजारात रविवारी (दि. २४) फळभाज्यांची ५ हजार २०५ क्विंटल, पालेभाज्यांची ६२ हजार १०० गड्या आणि फळांची ४९१ क्विंटल आवक नोंदवली गेली.
करटूले ही तशी रानभाजी आहे पण त्याची मागणी पाहता सोलापूर जिल्ह्यात अनेक शेतकरी करटूले या भाजीच्या लागवडीतून चांगले पैसे मिळवतात. काही शेतकरी सेंद्रिय पद्धतीने करटूलेची लागवड करून अधिक उत्पन्न मिळवतात.
पिंपरी मंडईत सोलापूरवरून करटूले दाखल झाले असून, त्याचा दर २७० ते ३०० रुपये आहे. बंगळुरूवरून आलेले सुरण ८० रुपये किलो दराने विकले जात आहे.
पनवेलवरून आवक झालेल्या पडवळ या फळभाजीला ७० ते ८० रुपये प्रतिकिलो भाव आहे. टोमॅटोची आवक वाढूनही दर स्थिर आहेत.
असा आहे बाजारभाव (प्रतिकिलो)कांदा : २० ते २५बटाटा : २५ ते ३०लसूण : १०० ते १२०आले : ७० ते ८०भेंडी : ५० ते ६०गवार : ८० ते ९०टोमॅट: ५०मटा: २० ते १००घेवडा : ८०दोडका : ५० ते ६०मिरची : ६० ते ७०दुधी भोपळ: ४०भुईमुग शेंग : ६० ते ८०काकडी : ३०कारली : ४०डांगर : ३० ते ४०गाजर : ५०फ्लॉवर : ३० ते ४०कोबी: २५ ते ३०वांगी : ४० ते ५०,ढोबळी: ५०बीट: ४०,पावटा : ६०,वालः ६०शेवगा : ८०,चवळी : ५० ते ६०घोसाळी : ५० ते ६०कढीपत्ता : १००लिंबू : ५० ते ६०मका कणीस : ४०रताळे : ८०करटूले : २७० ते ३००सुरण (बंगलोर) : ८०पडवळ (पनवेल) : ७० ते ८०
अधिक वाचा: राज्यात 'या' ठिकाणी हरतालिका ते ऋषीपंचमी या चार दिवसांत पाऊस सक्रिय होणार