Lokmat Agro >बाजारहाट > पावसामुळे फुलशेतीचे नुकसान; आवक झाली कमी, सणाच्या तोंडावरच वाढणार भाव

पावसामुळे फुलशेतीचे नुकसान; आवक झाली कमी, सणाच्या तोंडावरच वाढणार भाव

Rains cause damage to flower farming; arrivals are low, prices will increase just before the festival | पावसामुळे फुलशेतीचे नुकसान; आवक झाली कमी, सणाच्या तोंडावरच वाढणार भाव

पावसामुळे फुलशेतीचे नुकसान; आवक झाली कमी, सणाच्या तोंडावरच वाढणार भाव

ful bajar bhav फुलांचे भावदेखील दीडपट वाढले आहेत. गुरुपौर्णिमेला उच्चांकी दर गाठलेल्या फुलांच्या महागाईत श्रावण महिन्यात आणखी भर पडणार आहे.

ful bajar bhav फुलांचे भावदेखील दीडपट वाढले आहेत. गुरुपौर्णिमेला उच्चांकी दर गाठलेल्या फुलांच्या महागाईत श्रावण महिन्यात आणखी भर पडणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

संदीप बावचे
जयसिंगपूर : मे, जूनमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे फुले कुजल्याने उत्पादन घटून आवक कमी झाली आहे. शिवाय कर्नाटक, कोकणात फुले पाठविली जात असल्याने बाजारात कमी प्रमाणात फुले उपलब्ध होत आहेत.

फुलांचे भावदेखील दीडपट वाढले आहेत. गुरुपौर्णिमेला उच्चांकी दर गाठलेल्या फुलांच्या महागाईत श्रावण महिन्यात आणखी भर पडणार आहे. या पावसांत शिरोळ तालुक्यातील ३८ हेक्टरचे फुलशेतीचे नुकसान झाले.

लग्नसमारंभात फुलांना विशेष महत्त्व असते. ऐन लग्नसराईच्या काळात मे व जून महिन्यांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे फुलशेतीचे मोठे नुकसान झाले. त्याचा परिणाम भाव वाढीवर झाला आहे.

बाजारात दीडपट फुलांचे भाव वाढले आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने फुले महागच होती. २५ जुलैपासून श्रावणमासाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे फुलांचे भाव आणखीन वाढणार आहेत.

फुलांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम दरावरही दिसून येत आहे. मात्र, लिलाव बाजारात आवक कमी असल्याचेही दिसून येत आहे.

कर्नाटक व कोकण भागात फुले मोठ्या प्रमाणात पाठवली जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना वाढलेल्या दराचा फटकादेखील बसत आहे.

श्रावण, दसरा, दिवाळी...
पावसामुळे फुलांचे नुकसान झाल्यानंतर बाजारपेठेत फुलांची आवक कमी दिसून येत आहे. गुरुपौर्णिमा झाली असून, आता श्रावण महिना सुरू होणार आहे. त्यानंतर गणेशोत्सव दसरा आणि दिवाळी असे सण आहेत. त्यामुळे फुलांचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पावसाने फुलांची नासाडी; उत्पन्न घटले
◼️ मे महिन्याच्या अखेरीस व त्यानंतर जूनमध्ये झालेल्या पावसामुळे फुलशेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे उत्पन्नात घट झाली आहे.
◼️ अन्य ठिकाणाहून येणाऱ्या फुलांवर विक्रेत्यांना अवलंबून राहावे लागत आहे.
◼️ लग्नसमारंभात फुलांना विशेष महत्त्व असते. याच काळात मे आणि जूनमध्ये जोरदार पाऊस झाला.
◼️ त्यामुळे फुलशेतीचे मोठे नुकसान झाले. त्याचा परिणाम भाव वाढीवर झाला आहे.

बाजारातील सध्याचे दर
पांढरा शेवंती - २०० रु. कि.
निशिगंध - २५० रु. कि.
झेंडू - १४० रु. कि.
पिवळा शेवंती - २०० रु. कि.
गलांडा - २०० रु. कि.
पर्पल शेवंती - २४० रु. कि.
मोगरा (गजरा) - १२०० रु. कि.
बट मोगरा - ३०० रु. कि.
गुलाब २० नग - २५० रु

मागणीच्या तुलनेत फुलांचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे फुलांचे दर वाढले आहेत. श्रावण महिन्यात आणखी दर वाढण्याची शक्यता आहे. - सविता सावंत, फूल विक्रेत्या, जयसिंगपूर

अधिक वाचा: एफआरपी निश्चित करण्यासाठी केंद्र शासनाने दिला 'हा' निणर्य; आता असा ठरणार उसाचा दर?

Web Title: Rains cause damage to flower farming; arrivals are low, prices will increase just before the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.