सध्या कलिंगडची दैनंदिन आवक वाढली आहे. या वाढत्या आवकमुळे कलिंगडच्या बाजारभावात मात्र लक्षणीय घसरण झाली आहे. दहा दिवसांपूर्वी ३० रुपये किलो असलेला भाव सध्या १० रुपये किलोप्रमाणे खाली आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना कलिंगड लागवडीवर झालेला खर्च वसूल करणेही अवघड झाले आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील उजनी व सिना कोळगाव धरण क्षेत्रात कलिंगडची मोठ्या प्रमाणात लागवड होते. उन्हाळ्यात कलिंगडला मागणी वाढून जास्त बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा ठेवून अनेक शेतकऱ्यांनी कलिंगडची लागवड केली
१० रुपये प्रति किलोप्रमाणे कलिंगडची विक्री होती. परंतु, मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने भावावर नकारात्मक परिणाम झाला आहे. मागील दोन आठवड्यांत चांगल्या प्रतीच्या कलिंगडला ३० रुपये किलोचा भाव मिळाला होता. पण, आता १० रुपये किलोवर लिलाव होत आहे.
कलिंगडचा हंगाम साधारण फेब्रुवारी, मार्च महिन्यात सुरू होतो आणि जूनपर्यंत चालतो. आवक वाढल्याने भाव पडले. उन्हाळ्यात ते पंचवीस ते तीस रुपयेदरम्यान पोहोचतील, अशी शक्यता वाटत असताना किलोला १० रुपयांवर आले आहेत. - आण्णासाहेब सुपनवर, खांबेवाडी.
४० ते ५० रुपये किलोला भाव मिळणे अपेक्षित...
• कलिंगड लागवडीपासून ते बाजारात येईपर्यंत एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च येतो. एकरी १२ ते १४ टन उत्पादन मिळते. ९ हजार रोपांची लागवड होते. यात काढणी आणि वाहतुकीचा खर्चही मोठा आहे.
• त्यामुळे कलिंगडला किमान ४० ते ५० रुपये किलो भाव मिळणे अपेक्षित आहे. परंतु, सध्याचा मातीमोल भाव शेतकऱ्यांना तोट्यात टाकणार आहे. त्यामुळे यंदा कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कलिंगड आवक व दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
01/05/2025 | ||||||
अकलुज | लोकल | क्विंटल | 25 | 300 | 500 | 400 |
30/04/2025 | ||||||
पुणे-मांजरी | --- | क्विंटल | 8 | 3000 | 4000 | 3500 |
मुंबई - फ्रुट मार्केट | --- | क्विंटल | 4745 | 1200 | 1600 | 1400 |
खेड-चाकण | --- | क्विंटल | 240 | 800 | 1200 | 1000 |
श्रीरामपूर | --- | क्विंटल | 25 | 500 | 1000 | 750 |
सोलापूर | लोकल | क्विंटल | 190 | 300 | 1000 | 500 |
सांगली -फळे भाजीपाला | लोकल | क्विंटल | 60 | 500 | 1200 | 850 |
पुणे | लोकल | क्विंटल | 1148 | 500 | 1200 | 800 |
बारामती-जळोची | नं. १ | क्विंटल | 22 | 700 | 1200 | 1000 |