Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > चंपाषष्ठीमुळे वांग्यांच्या दरात वाढ; बाजारात इतर भाज्यांच्या दरातही तेजी

चंपाषष्ठीमुळे वांग्यांच्या दरात वाढ; बाजारात इतर भाज्यांच्या दरातही तेजी

Price of brinjals increases due to Champashashti; prices of other vegetables also rise in the market | चंपाषष्ठीमुळे वांग्यांच्या दरात वाढ; बाजारात इतर भाज्यांच्या दरातही तेजी

चंपाषष्ठीमुळे वांग्यांच्या दरात वाढ; बाजारात इतर भाज्यांच्या दरातही तेजी

चंपाषष्ठीमुळे वांग्यांच्या दरात वाढ झाली असून, बाजारात साध्या व भरताच्या वांग्यांची १२० रुपये किलो दराने विक्री झाली. दरम्यान भाजी बाजारात गेल्या दोन दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठी तेजी दिसून येत आहे.

चंपाषष्ठीमुळे वांग्यांच्या दरात वाढ झाली असून, बाजारात साध्या व भरताच्या वांग्यांची १२० रुपये किलो दराने विक्री झाली. दरम्यान भाजी बाजारात गेल्या दोन दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठी तेजी दिसून येत आहे.

चंपाषष्ठीमुळे वांग्यांच्या दरात वाढ झाली असून, नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या बाजारात मंगळवारी साध्या व भरताच्या वांग्यांची १२० रुपये किलो दराने विक्री झाली. दरम्यान मनमाड शहरातील भाजी बाजारात गेल्या दोन दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठी तेजी दिसून येत आहे.

भाज्यांचे भाव जवळपास दुप्पट झाले आहे. चंपाषष्ठीमुळे साधी व भरताची वांगी १२० रुपये किलो दराने विकली जात आहेत. मनमाडला इतर भाज्यांचे दरही वधारले असून, गिलकी ८० रुपये किलो, दोडकी ८० रुपये किलो, टमाटे ८० रुपये किलो, फ्लॉवर ८० ते १०० रुपये किलो, शिमला मिरची १०० रुपये किलो, शेवग्याच्या शेंगा २०० रुपये किलो, आले १०० रुपये किलो.

कांदे २० रुपये किलो, बटाटे ३० रुपये किलो, गड्डा कोबी (लहान) गड्डा २० रुपये नग, वालाच्या शेंगा ८० रुपये किलो, मेथीची जुडी २५ ते ३० रुपये नग, शेपू २० रुपये जुडी, कांदापात २० रुपये जुडी, पालक २० रुपये जुडी, कोथिंबीर १५ ते २० रुपये जुडी.

हिरवी मिरची ६० ते ८० रुपये किलो, दुधी भोपळा २० ते ३० रुपये नग, लसूण ८० रुपये किलो, गाजर ६० रुपये किलो, वाटाणे २०० रुपये किलो, श्रावण घेवडा ८० रुपये किलो, तर भेंडी ८० रुपये किलो असे दर होते. चंपाषष्ठीमुळे वांग्याच्या दरात वाढ झाल्याचे भाजी विक्रेते भगवान परदेशी यांनी सांगितले.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील वांग्याची आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/11/2025
अकलुज---क्विंटल12250068005500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल26300060004500
खेड-चाकण---क्विंटल245300050004000
श्रीरामपूर---क्विंटल23550060005750
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल25252030002810
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल59180024002100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1300060004500
मुंबईलोकलक्विंटल739260044003500
भुसावळलोकलक्विंटल26550080007500
वाईलोकलक्विंटल10400055005000
कामठीलोकलक्विंटल13352040203770

हेही वाचा : बाजारात आलेली हरभऱ्याची हिरवी भाजी खा, रोगप्रतिकारशक्ती वाढवा; आहारतज्ज्ञांचा सल्ला

Web Title : चंपाषष्ठी के कारण बैंगन के दाम बढ़े; अन्य सब्जियां भी महंगी।

Web Summary : चंपाषष्ठी के कारण मनमाड बाजार में बैंगन की कीमतें ₹120/किलो तक पहुंच गईं। लौकी, टमाटर और शिमला मिर्च जैसी अन्य सब्जियों की कीमतों में भी काफी वृद्धि हुई। इस वृद्धि का असर घरेलू बजट पर पड़ रहा है।

Web Title : Brinjal prices surge due to Champashashti; other vegetables also costly.

Web Summary : Brinjal prices in Manmad market soared to ₹120/kg due to Champashashti. Other vegetables like gourds, tomatoes, and capsicum also witnessed significant price hikes. The rise is impacting household budgets.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.