Join us

Popati Party : थर्टी फर्स्टसाठी पोपटी; पुणेरी वाल शेंगांचा भाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 17:46 IST

रायगड जिल्हा वाल पोपटीसाठी प्रसिद्ध आहे. थर्टीफर्स्टच्या पार्टीत पोपटीचा बेत असतोच. मात्र, जिल्ह्यातील रूचकर गावठी वालाच्या शेंगा बाजारात येण्यास वेळ आहे.

रायगड जिल्हा वाल पोपटीसाठी प्रसिद्ध आहे. थर्टीफर्स्टच्या पार्टीत पोपटीचा बेत असतोच. मात्र, जिल्ह्यातील रूचकर गावठी वालाच्या शेंगा बाजारात येण्यास वेळ आहे.

सध्या पुणे जिल्ह्यातून वालाच्या शेंगा बाजारात आल्या आहेत. या शेंगा ९० ते १०० रुपये किलोने विकल्या जात आहेत. स्थानिक गावठी शेंगा अजून तयार झाल्या नाहीत.

त्यात अवकाळी पाऊस व खराब हवामानाचा प्रतिकूल परिणाम पिकावर झाल्याने आणखी एक महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या बाजारात पुणे जिल्ह्यातून वालाच्या शेंगा विक्रीसाठी आल्या आहेत.

या शेंगा ३० ते ५० रुपये किलोने मिळत असतात. मात्र, या शेंगांची मागणी वाढल्याने ९० ते १०० रुपये किलोने विकल्या जात आहेत.

रायगड जिल्ह्याच्या मातीत पिकवलेल्या टपोऱ्या दाण्यांच्या गावठी शेंगा पोपटी अधिक पसंती असते. या शेंगांना सुरुवातीला १०० ते १२० रुपये किलो भाव असतो. शेंगा मुबलक आल्यावर ५० ते ६० रुपये किलोने विकल्या जातात.

सध्या गावठी वालाची शेंगा आल्या नसल्याने पुणेरी वालाच्या शेंगा बाजारात आहेत. कोणी पोपटीसाठी तर कोणी उकडून खाण्यासाठी नेत आहेत. पुणेरी वाल्यांचा शेंगाची मागणी वाढली आहे. - प्रवीण पाटील, भाजीविक्रेता

सध्याचा हवामान पाहता गावठी वालाच्या शेंगांचे पीक एक महिनाभर तरी लांबणीवर जाणार आहे. - कमलाकर म्हात्रे, शेतकरी

टॅग्स :बाजारमार्केट यार्डपुणेशेतकरीशेतीभाज्यारायगडपाऊस