परराज्यांतील डाळिंबाची आवक सुरू झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या सरासरी प्रतिकिलो ५० ते ६० रुपये इतका दर आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये हाच दर १२० ते १५० इतका होता. घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना फटका बसला असून, तो आर्थिक संकटात सापडला आहे.
सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून डाळिंब शेतीला पसंती दिली आहे. कमी खर्चात आणि कमी पाण्यात चांगले उत्पादन देणारे पीक आहे. अनुकूल हवामान, कमी पाणी व खडकाळ जमिनीवर येणारे फळबागेचे डाळिंब पीक आहे. ठिबक सिंचन, शेत तलाव कूपनलिका खोदून उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. दरीबडची, संख, उमदी, सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी, सिद्धनाथ, आसंगी, दरीकोणूर, वाळेखिंडी, काशीलिंगवाडी परिसरात डाळिंब क्षेत्र अधिक आहे.
उन्हाळ्यात टँकरने पाणी देऊन बागा वाचविल्या आहेत. डाळिंबाला चांगला दर मिळत गेल्याने शेतकऱ्यांच्या जीवनमानात मोठा बदल घडविला आहे. यावर्षी सरासरी १२० ते १५० रुपये इतका दर मिळाला. मात्र, गेल्या वीस दिवसांपासून दरात घसरण झाली आहे. जत मार्केटमध्ये डाळिंबाचे सौदे काढले जात आहेत. हजारो क्विंटल विक्री होत आहे. यापेक्षा जादा दर मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी बागा ठेवल्या होत्या; मात्र अचानक दर निम्म्यावर आला आहे. बागा पुढे जात आहेत. आतून बिया काळ्या पडत आहेत.
डाळिंबाचे दर
सध्याचा दर | मागील दर | |
केशर | ६० ते ८० रुपये | १२० ते १५० रुपये |
गणेश | ५० ते ६० रुपये | ८० ते ९० रुपये |
दरात घसरण
मृग बहारातील डाळिंब सध्या मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरात विक्रीला येत आहेत. तर राजस्थान, गुजरात राज्यांतील आवक वाढल्याने दरात घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
विकास सोसायटी संकटात
जत तालुक्यातील विकास सोसायटीने शेतकऱ्यांना बागावर कोट्यवधी रुपयांचे कर्जाचे वाटप केले आहे. बागा अडचणीत आल्याने विकास सोसायटी अडचणीत येणार आहेत.
कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील डाळिंब आवक व दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
04/12/2024 | ||||||
अमरावती- फळ आणि भाजीपाला | --- | क्विंटल | 104 | 8000 | 10000 | 9000 |
छत्रपती संभाजीनगर | --- | क्विंटल | 17 | 1500 | 6500 | 4000 |
मुंबई - फ्रुट मार्केट | --- | क्विंटल | 1276 | 8000 | 13000 | 10500 |
राहता | --- | क्विंटल | 28 | 1000 | 15000 | 4000 |
पुणे | आरक्ता | क्विंटल | 676 | 1500 | 15000 | 8200 |
सांगोला | भगवा | क्विंटल | 172 | 2700 | 10500 | 8600 |
इंदापूर | भगवा | क्विंटल | 7 | 800 | 8000 | 3000 |
आटपाडी | भगवा | क्विंटल | 953 | 1000 | 12500 | 6700 |
सोलापूर | लोकल | क्विंटल | 175 | 1000 | 11000 | 4200 |
सांगली -फळे भाजीपाला | लोकल | क्विंटल | 220 | 2000 | 12000 | 7000 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 408 | 2000 | 6000 | 5000 |
नाशिक | मृदुला | क्विंटल | 333 | 900 | 13000 | 12000 |