ठाणे जिल्ह्यात भाताच्या शेतीचा झेंडा उंचावणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा दरवाढीचा दिलासा मिळत आहे. काही वर्षातील नुकसानानंतर यंदा बाजारभावाने थोडीशी आशा पल्लवित केली आहे.
भाताची मागणी दिवसेंदिवस वाढत असली तरी मागणीमध्ये तितकीच वाढ झाल्यामुळे भाताचे दर झपाट्याने वाढले आहेत.
शहापूर, मुरबाड, कल्याण, उल्हासनगर, ठाणे आदी प्रमुख शहरांमध्ये भाताला अठराशे ते साडेअठराशे रुपये क्विंटल दराने भाव मिळतो. गेल्यावर्षी याच काळात भाताला खासगी सतराशे ते अठराशे रुपये क्विंटल भाव होता.
तर सरकारी दोन हजार ते बावीसशे होता. अधिक पाण्याचे पीक, पण अतिवृष्टीचाही फटका भात हे अधिक पाण्यात तग धरणारे पीक आहे. मात्र, हवामानातील अनियमितता आणि अलीकडील अतिवृष्टीमुळे भात पिकांवरही परिणाम झाला आहे.
अति पाऊस आणि वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे पीक कुजून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. तर कधी कमी पावसामुळे पीक करपून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात घट सोसावी लागते.
दलालांचा सापळा आणि शेतकऱ्यांची निराशाउत्पादन कमी असतानाही बाजारपेठ दलालांच्या हातात असल्याने अपेक्षित दर मिळत नाही. व्यापारी, दलाल मिळेल त्या भावाने भात उचलून नेतात आणि बाजारात तेच भात महागात विकतात. काही शेतकरी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असले तरी दलालांची साखळी अजूनही मजबूत आहे. सरकारी स्तरावर हस्तक्षेप आणि थेट शेतकरी बाजार संलग्नता यासाठी पावले उचलण्याची मागणी होत आहे.
बुरशीजन्य रोगांचा प्रकोप, भाताचे क्षेत्र घटलेभातशेतीला बुरशीजन्य तसेच बगळ्या, करप्यासारख्या रोगांनी ग्रासले होते. उत्पादनात घट झाली होती. कृषी विभागाने तत्काळ उपाययोजना करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ठाणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र मागील तीन वर्षामध्ये औद्योगिकीकरण व इतर कारणांमुळे झपाट्याने कमी होत आहे.
फवारणी देखभालीचा खर्च शेतकऱ्यांच्या डोक्यावरभात हे उच्च देखभाल लागणारे पीक नसले तरी खर्च प्रचंड वाढला आहे. एका एकरावर फवारणीसाठी सरासरी दोन ते तीन हजार रुपये खर्च होतो. कीटकनाशक बीज संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा वापर अपरिहार्य आहे. मजुरी, खत, पाणी आणि औषधांचा एकत्रित खर्च शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ करत आहे.
अधिक वाचा: राज्यभरातील एकूण १७० शेतकरी जाणार परदेश कृषी अभ्यास दौऱ्यावर; कशी होणार निवड?