बारामती : हंगाम २०२५-२६ च्या शासकीय खरेदी केंद्रामार्फत तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया २० जानेवारीपासून सुरू झाली आहे.
शासनाने कळविलेल्या आदेशानुसार ही नोंदणी प्रक्रिया २० जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत पार पाडली जाणार आहे.
बारामती तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे सभापती विनायक गावडे आणि उपसभापती अरुण सकट यांनी केले आहे.
केंद्र शासनाने तुरीचा हमी दर रु. ८,००० असा निश्चित केला असल्याने शासनाच्या निकषांप्रमाणे व ठरलेल्या दराने वाळलेली व स्वच्छ असलेली तूर खरेदी केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे.
त्यासाठी जमिनीचा ७/१२ उतारा व त्यावर तुरीची नोंद असलेला सन २०२५-२६ पिकपेरा, आधारकार्ड, आयएफएससी कोडसहित बँकेचे पासबुक झेरॉक्स, मोबाइल नंबर इत्यादी सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत, अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
एसएसएमद्वारे माहिती
◼️ दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांनी बाबालाल काकडे निरा कॅनॉल संघ, बारामती येथे ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे.
◼️ ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचीच शासकीय हमी दराने तूर खरेदी केली जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीत नोंदणी करावी.
◼️ तूर खरेदी सुरू झाल्यानंतर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसएसएमद्वारे कळविण्यात येईल.
◼️ एसएसएम आल्यावरच तूर खरेदी केंद्रावर तूर विक्रीस आणावी लागेल.
◼️ तुरीचा दर्जा पाहून तूर खरेदी केली जाईल असे निरा संघाचे चेअरमन सतीश काकडे यांनी सांगितले.
अधिक वाचा: शेतजमिनींच्या पोटहिश्श्यांच्या मालकी हक्काबाबतचे वाद आता मिटणार; सुरु होतोय 'हा' पथदर्शी प्रकल्प
