बऱ्याच वर्षांनंतर सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता; पण या आठवड्यात दरात पुन्हा घसरण सुरू झाली आहे.
अमेरिकेसोबतच्या शेतीच्या खुल्या व्यापारास भारताने परवानगी दिल्याची हवा तयार होताच, त्याचा थेट परिणाम सोयाबीनच्या दरावर झाला आहे. प्रतिक्विंटल पाचशे रुपयांनी दर कमी झाले आहेत.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने गेली तीन-चार वर्षे खूपच अडचणीची गेली आहेत. शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची विक्री करावी लागली.
पिकवलेले सोयाबीन शेतकऱ्यांना मातीमोल दराने विक्री करावे लागले. त्याचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यातील सोयाबीनचे क्षेत्र कमी होण्यावर झाला.
यंदा खरीप हंगामाच्या तोंडावरही दर घसरलेलेच होते; पण गेल्या पंधरा-तीन आठवड्यांत सोयाबीनने उसळी घेतली होती. प्रतिक्विंटल ५२०० ते ५८०० रुपयांपर्यंत दर पोहोचला होता.
आता शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन नसल्याने या दरवाढीचा फायदा त्यांना होणार नसला तरी आगामी हंगामासाठी आशादायक दर होता.
पण केंद्र सरकारने अमेरिकेबरोबर कृषीच्या खुल्या व्यापारास परवानगी दिल्याची देशभर चर्चा सुरू झाली आणि त्याचा परिणाम शेती उत्पादनांच्या दरावर होऊ लागला आहे. त्याचा पहिला फटका सोयाबीनला बसला आहे.
घाऊक बाजारात प्रतिक्विंटल पाचशेंनी दर खाली आले. केंद्र सरकारने अमेरिकन शेतीमालावरील आयात शुल्क कमी केल्याने त्याचा शेती उत्पादनांवर परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला आहे.
दरम्यान, कोणत्याही युरोपीय देशांशी शेती बाजारपेठ खुली न केल्याचा दावा राज्य शासनाच्यावतीने केला आहे.
प्रतिक्विंटल ५२०० रुपये दर गेल्या पंधरा-तीन आठवड्यात सोयाबीनचा राहिला आहे. आता शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन नसल्याने या दरवाढीचा फायदा त्यांना होणार नसला तरी आगामी हंगामासाठी आशादायक असा दर होता.
अस्थिर भावामुळे उत्पादन घटले
मागील तीन-चार वर्षांपासून सोयाबीनचे दर आणि उत्पादन खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांनी उत्पादनांकडे पाठ फिरवली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ५६ हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे होते. मात्र, गेल्या हंगामात हे क्षेत्र ४२ हजार हेक्टरपर्यंत खाली आले आहे.
अधिक वाचा: १०० वर्षांपूर्वीच्या भंडारदरा धरणाचा इतिहास कसा पोहोचला इंग्लंडच्या राजापर्यंत; वाचा सविस्तर
