Join us
Daily Top 2Weekly Top 5

चाळीमध्ये साठवलेला कांदा संपल्याने मंचर बाजार समितीत कांदा दर वाढले; वाचा कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:42 IST

Kanda bajar bhav मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाल्याने बाजारभाव किंचित वाढले आहेत. नवीन कांदा येण्यास अजून कालावधी आहे.

मंचर : आवक कमी झाल्यामुळे कांद्याचे बाजारभाव किंचित वाढले आहेत. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या कांद्याला दहा किलोला २२७ रुपये असा बाजारभाव मिळाला.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाल्याने बाजारभाव किंचित वाढले आहेत. नवीन कांदा येण्यास अजून कालावधी आहे.

शेतकऱ्यांनी कांदा चाळीमध्ये साठवलेला जुना कांदा संपत चालल्यामुळे आणि पावसामुळे कांदा लागवड उशिरा झाल्यामुळे नवीन कांद्याची बाजार आवक कमी झालेली दिसून येत आहे.

चांगल्या प्रतीच्या कांद्याला मंगळवारी दहा किलोला २२७ रुपये असा बाजारभाव मिळाला. एकूण ५४८१ पिशवी कांद्याची आवक झाली, अशी माहिती सभापती नीलेश थोरात यांनी दिली.

मागील अनेक दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव वाढत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. बराखीत साठवलेला कांदा सडला गेला.

शेतकऱ्यांनी वेळोवेळी कांदा विक्रीसाठी आणला मात्र बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित नफा मिळाला नाही.

कांद्याचे प्रति दहा किलोचे दर◼️ सुपर लॉट १ नंबर गोळा कांदा - २२७ ते २२७ रुपये.◼️ सुपर गोळे कांदे - १८० ते १९० रुपये.◼️ सुपर मीडियम २ नंबर कांदा - १६० ते १७५ रुपये.◼️ गोल्टी कांदा - ९० ते १२० रुपये.◼️ बदला कांदा व चिंगळी कांदा - ३० ते १०० रुपये.

बाजारभाव अभावामुळे शेतकऱ्यांना फटकायावर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावाच्या अभावामुळे मोठा फटका बसला आहे. पुढील काळात कांद्याला चांगला बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

अधिक वाचा: भीमाशंकर साखर कारखान्याचा पहिला हप्ता जाहीर; किती रुपयाने होणार पहिले पेमेंट?

English
हिंदी सारांश
Web Title : Onion Prices Rise in Manchar Market Due to Depleted Stocks

Web Summary : Onion prices slightly increased in Manchar market due to reduced supply. Old stocks dwindled, and delayed planting impacted new arrivals. Top-quality onions fetched ₹227 per 10 kg. Farmers hope for better prices amid previous losses.
टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमंचरशेतकरीपाऊस