Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market: ऐन हंगामात बाजारात दराचा रोलर कोस्टर; जाणून घ्या काय आहे कारण

Onion Market: ऐन हंगामात बाजारात दराचा रोलर कोस्टर; जाणून घ्या काय आहे कारण

Onion Market: Roller coaster of prices in the market during the season; Know what is the reason | Onion Market: ऐन हंगामात बाजारात दराचा रोलर कोस्टर; जाणून घ्या काय आहे कारण

Onion Market: ऐन हंगामात बाजारात दराचा रोलर कोस्टर; जाणून घ्या काय आहे कारण

Onion Market: यंदाच्या खरीप हंगामात कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली असली, तरी बाजारभावात प्रचंड अस्थिरता जाणवत आहे. परिणामी, कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. (Onion Market)

Onion Market: यंदाच्या खरीप हंगामात कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली असली, तरी बाजारभावात प्रचंड अस्थिरता जाणवत आहे. परिणामी, कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. (Onion Market)

शेअर :

Join us
Join usNext

Onion Market : यंदाच्या खरीप हंगामात कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली असली, तरी बाजारभावात प्रचंड अस्थिरता जाणवत आहे. परिणामी, कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. (Onion Market)

सद्यः स्थितीत बाजारात आवक कमी असल्याने दरवाढ होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. नुकत्याच कांद्याच्या हंगामात बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे दरात मोठी घट झाली आहे. (Onion Market)

१,१०० टिकवून ठेवण्यासाठी ते १२०० रुपयांपर्यंत बाजार दर पोहचले आहे. परिणामी, कांद्याकडून नगदी मिळवण्याची अपेक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. (Onion Market)

मागणी कमी आणि पुरवठा अधिक झाल्याने बाजारातील दर गडगडले आहेत. कांदा गोदाम व सुक्या जागेची आवश्यकता असते, ज्यासाठी अतिरिक्त खर्च येतो. त्यातच बाजारात कांदा पोहोचवण्याचा वाहतूक खर्च शेतकऱ्याच्या खिशाला चटका लावतो. या सर्व आर्थिक ओझ्यामुळे अनेक शेतकरी हताश झाले आहेत. (Onion Market)

ऐन हंगामात बाजारात दराचा रोलर कोस्टर!

हंगामाच्या सुरुवातीला कांद्याला प्रति क्विंटल २ हजार रुपये इतका दर मिळत होता. मात्र, मागील आठवड्यांत तो ८००-११०० रुपयांवर येऊन घसरला आहे.
बाजार समित्यांमधून मिळणाऱ्या माहितीनुसार, दररोज कांद्याचा दर १००-२०० रुपयांनी बदलतो आहे. शेतकरी म्हणतात, कधी दर वाढतो, तर दुसऱ्याच दिवशी कोसळतो. (Onion Market)

शेतकऱ्यांच्या मागण्या

* कांद्याला किमान हमीभावाची (एमएसपी) तरतूद करावी.

* बाजार हस्तक्षेप खरेदी सुरू करावी. निर्यात धोरणात सुलभता आणावी.

* साठवणूक सुविधा वाढवाव्यात.

लागवड खर्च दुपटीने वाढला, शेतकरी हैराण!

बियाणे, खतं, औषधे, मजुरीचे दर गगनाला भिडलेले असताना शेतमालाला मिळणारे दर समाधानकारक नाहीत. एका एकर कांद्याच्या उत्पादनासाठी सरासरी ४०,००० ते ४५,४०० रुपये खर्च येतो; मात्र बाजारातून मिळणारे उत्पन्न त्याच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे.

कांदा कमी दरांत विक्री करणे म्हणजे घाट्याचा व्यवहार आहे. खर्चाचा भार वाढतोय, पण उत्पन्न नाही. सरकारने कांद्याच्या दरासाठी ठोस उपाययोजना केली पाहिजे. - परमेश्वर अमलकार, कांदा उत्पादक शेतकरी

रमजान महिना लवकर आल्याने मागणी वाढली होती. त्यामुळे कांद्याचे दर २,००० ते २,१०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र, आता मागणी घटल्याने दर कमी झाले. परंतु, उठाव कमी असल्यामुळे काही दिवसांत दरवाढ होण्याची शक्यता आहे. - योगेश पवित्रकार, कांदा व्यापारी, अकोला

हे ही वाचा सविस्तर : Market Update: तूर, हळदीच्या दरांत 'इतक्या' हजारांची घसरण; काय आहे कारण वाचा सविस्तर

Web Title: Onion Market: Roller coaster of prices in the market during the season; Know what is the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.