ओतूर: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे गुरुवारी बाजारच्यानिम्मित कांद्याची ३४,८३२ पिशवीची आवक झाली आहे, अशी माहिती जुन्नर बाजार समितीचे सभापती यांनी सांगितले.
ओतूर उपबाजारात गेल्या अनेक महिन्यांपासून विविध कृषी उत्पन्नांच्या बाजारभावात कधी चढउतार तर कधी स्थिरता पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवार, दि. ६ रोजी शेतकऱ्यांना बाजारभाव वाढण्याची मोठी अपेक्षा होती.
मात्र, अपेक्षेप्रमाणे भावात वाढ न झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा निराश झाले. विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे.
बाजार समितीतील शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, ओतूर उपबाजारात कांद्याचा सरासरी दर प्रतिकिलो ७ ते १५ रुपयांपर्यंत राहिला. उत्पादन खर्च वाढलेला असताना एवढ्या कमी दरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
दहा किलो पुढीलप्रमाणे कांदा बाजारभाव
गोळे कांदा - १५० ते २००
सुपर कांदा - १०० ते १७०
गोल्टी/गोल्टा कांदा - २० ते १००
कांदा बदला - १० ते १००
बटाटा २७ पिशवी आवक झाली त्याला भाव ५० ते २०० पर्यंत मिळाला, तर लसूण सात पिशव्या आवक झाला त्याला २०० ते ३५१ पर्यंत बाजार भाव मिळाला.
भाव मिळत नसल्याने शेतकरी हताश
◼️ वर्षभर मेहनत करून कांद्याचे उत्पादन घेतले तरी त्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत. कांदा हा महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असून, त्यावर शेतकऱ्यांचा मोठा महसूल अवलंबून असतो.
◼️ मात्र यावर्षी बाजारातील अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. शासनाने कांदा उत्पादकांच्या हितासाठी तातडीने ठोस व दूरगामी धोरण आखावे, तसेच शेतमालाला हमीभाव मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.
◼️ शेतकऱ्यांच्या मनातील ही व्यथा ओतूरसह संपूर्ण जिल्ह्यातील परिस्थितीचे चित्र स्पष्ट करते कांद्याने यंदा शेतकऱ्यांना अक्षरशः रडविले आहे. विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे.
अधिक वाचा: शेतकऱ्यांनो पीएम किसानच्या २१ व्या हप्त्यासाठी 'ह्या' त्रुटींची पूर्तता करा तरच मिळतील पैसे
