Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > पोषक गुणधर्म असलेला राजमा पोहचला ११ हजारांवर; शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा

पोषक गुणधर्म असलेला राजमा पोहचला ११ हजारांवर; शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा

Nutritious Rajma beans reach 11,000; Farmers are getting relief | पोषक गुणधर्म असलेला राजमा पोहचला ११ हजारांवर; शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा

पोषक गुणधर्म असलेला राजमा पोहचला ११ हजारांवर; शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा

Rajma Market Rate : पीकबदल करीत राजम्याला पसंती देणाऱ्या शेतकऱ्यांना राजमा पिकाने दिलासा दिला आहे. मागील आठवडाभरापासून राजमाची आवक बाजारात सुरु झाली असून, गुरुवारी राजम्याचा दर ११ हजारांवर पोहचल्याचे दिसून आले.

Rajma Market Rate : पीकबदल करीत राजम्याला पसंती देणाऱ्या शेतकऱ्यांना राजमा पिकाने दिलासा दिला आहे. मागील आठवडाभरापासून राजमाची आवक बाजारात सुरु झाली असून, गुरुवारी राजम्याचा दर ११ हजारांवर पोहचल्याचे दिसून आले.

लातूर जिल्ह्यात पीकबदल करीत राजम्याला पसंती देणाऱ्या शेतकऱ्यांना राजमा पिकाने दिलासा दिला आहे. मागील आठवडाभरापासून राजमाची आवक बाजारात सुरु झाली असून, गुरुवारी लातूरच्याबाजारात राजम्याचा दर ११ हजारांवर पोहचल्याचे दिसून आले.

लातूर जिल्ह्यात बागायती शेतकरी पारंपरिक पिकाला फाटा देत हरभरा ऐवजी राजमा पिकाला पसंती देत आहेत. यंदाही जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी राजमा पीक घेतले आहे. या पिकाला हरभरा पिकाएवढीच मेहनत, खर्च आहे. मात्र, उत्पादन आणि दरात राजमा हरभरा पिकाच्या पुढे आहे.

विशेषतः काबुली हरभरा घेणारे शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. राजमा आरोग्याला फायदेशीर आहे. गुरुवारी लातूरच्या बाजार समितीत १,१४२ क्विंटल एवढी राजम्याची आवक झाली. कमाल दर ११ हजार एक रुपया एवढा तर सर्वसाधारण दर ८ हजार ६२५ रुपये क्विंटल एवढा दर होता.

हरभरा साडेपाच ते सहा हजारांवर...

• बागायती शेतकरी जादा उत्पादन घेण्यासाठी काबुली व इतर जातीच्या हरभरा पिकाची लागवड करीत होते. मात्र, काबुली हरभऱ्याची लागवड, काढणी व मळणीच्या तुलनेत राजमा पीक सरस ठरत असल्याने अनेक शेतकरी या पिकाकडे वळले असल्याचे दिसते.

• काबुली हरभऱ्याचे दर चांगले असले तरी कमी उत्पादन व थ्रेशरद्वारे मळणी करताना डॅमेज होत असल्याने राजमा पिकाकडे वळल्याचे शेतकरी सांगतात. सध्या हरभऱ्याचा दर ५ ते ६ हजारांच्या दरम्यान आहे.

• काबुली हरभरा घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तर राजमा हे हुकमी पीक ठरत आहे. राजमा हा प्रथिनांचा उत्तम स्रोत असल्याने आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याने बाजारपेठेत याला मोठी मागणी आहे. आहारात राजमाचा वापर वाढला आहे. त्यामुळे भाव सरस ठरत आहे.

हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा

Web Title : राजमा की कीमतें ₹11,000 तक बढ़ीं, लातूर के किसानों को राहत

Web Summary : लातूर के किसानों को राहत मिली क्योंकि राजमा की कीमतें ₹11,000/क्विंटल तक पहुंच गईं। चने जैसी पारंपरिक फसलों से हटकर, किसान लाभ कमा रहे हैं। राजमा के स्वास्थ्य लाभों से मांग बढ़ रही है, जो इसे काबुली चने की तुलना में एक लाभदायक विकल्प बनाता है।

Web Title : Rajma Prices Soar to ₹11,000, Offering Relief to Latur Farmers

Web Summary : Latur farmers find solace as rajma prices hit ₹11,000/quintal. Switching from traditional crops like chickpeas, farmers are reaping benefits. Rajma's health benefits drive demand, making it a profitable alternative, especially compared to kabuli chickpeas.