Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > नवीन भात दोन हजारावर

नवीन भात दोन हजारावर

New rice market at two thousand | नवीन भात दोन हजारावर

नवीन भात दोन हजारावर

गतवर्षी सर्वसाधारण भाताला प्रति क्विंटल २०४० रुपये दर मिळाला होता. यावर्षी दरात वाढ होण्याची शक्यता आहे. विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.

गतवर्षी सर्वसाधारण भाताला प्रति क्विंटल २०४० रुपये दर मिळाला होता. यावर्षी दरात वाढ होण्याची शक्यता आहे. विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.

भात पीक तयार होत असून, कापणीला येत्या १५ ते २० दिवसांत सुरुवात होण्याची शक्यता आहे. गतवर्षी सर्वसाधारण भाताला प्रति क्विंटल २०४० रुपये दर मिळाला होता. यावर्षी दरात वाढ होण्याची शक्यता आहे. विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.

दरवर्षी शासनाकडून भाताला हमीभाव दिला जातो. दि मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून भाताची खरेदी केली जाते. जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी स्वतः पुरता भात ठेवून उर्वरित भात विक्रीतून आर्थिक प्राप्ती मिळवत आहेत. मात्र, भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. नवीन दर शासनाकडून अद्याप जाहीर झालेले नसले तरी गतवर्षीपेक्षा दरात वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकरी नवीन दराच्या प्रतीक्षेत आहेत.

भाव आणखी वाढणार
गतवर्षी सर्वसाधारण भाताला (प्रति क्विंटल) २०४० रुपये दर मिळाला होता. दरवर्षी दरवाढ करण्यात येते. त्यामुळे यावर्षी भाताचा भाव नक्की वाढणार आहे. लवकरच दर जाहीर केले जाणार आहेत.

५५ हजार हेक्टरवर भात लागवड
जिल्ह्यात एकूण ५५ हजार २७१ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. हळवे भात तयार झाले असून, येत्या १५ दिवसांत कापणी सुरु होणार आहे.

कमी पावसाचा फटका
यावर्षी लागवडीनंतर पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने फुटवे कमी आले आहेत. त्यामुळे उत्पादकतेत घट होण्याची शक्यता आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भात खरेदी करण्यात येणार आहे. दर अद्याप जाहीर झाले नसले तरी ऑनलाइन नोंदणीबाबत लवकरच सूचना प्राप्त होणार आहेत. - पी. जे. चिले, अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन रत्नागिरी

दरवर्षी शंभर ते दोनशे रुपयाची वाढ केली जाते. यावर्षी सुरुवातीच्या कमी पावसामुळे उत्पादक धोक्यात असल्याने दरवाढ चांगली मिळावी. - सुरेश माचियले

यावर्षी सुरुवातीचा पाऊस लावल्याने भाताला अपेक्षित फुटवे न आल्यामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका आहे. त्यामुळे दरवाढ अपेक्षित आहे. - विजय शेलार

Web Title: New rice market at two thousand